News Flash

ताक पिण्याचे ‘हे’ ८ महत्त्वाचे फायदे तुम्हाला माहित आहेत का?

जाणून घ्या, ताक पिण्याचे काही खास फायदे

पृथ्वीतलावरील अमृत कोणतं असा प्रश्न विचारल्यावर अनेक जण पटकन ताक असं उत्तर देतील. उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची कमतरता भरु काढण्यासाठी किंवा अशक्तपणा दूर करण्यासाठी ताक हा सर्वोत्तम पर्याय आहे. कोल्डड्रिंक किंवा अन्य शीतपेय पिण्यापेक्षा ताक, पन्ह, उसाचा रस हे अत्यंत सुंदर पर्याय आहेत. यामध्ये ताक पिण्याचे अगणित फायदे आहेत. त्यामुळे ताक पिण्याचे शरीरासाठी कोणते फायदे आहेत ते जाणून घेऊयात.

१. दुग्धजन्य पदार्थांपैकी एक पदार्थ म्हणजे ताक. शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आणि अनेक गुणधर्म ताकात आहेत. दह्यामध्ये पाणी मिक्स करुन ते घुसळलं की ताक तयार होतं. ताक प्यायल्यामुळे सतत लागणारी तहान शमते.

२. ताक प्यायल्यामुळे पोट पटकन भरतं.

३. ताकामुळे शरीराला थंडावा मिळतो. त्यामुळे उन्हाळ्यात आवर्जुन ताक प्यावं.

४. ताकामुळे वजन नियंत्रणात राहतं.

५. ताकामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतं.

६. पचनक्रिया सुरळीत राहते.

७. अन्नपचन नीट होतं.

८. अपचन, पित्ताचा त्रास, गॅसेस यांचा त्रास कमी होतो.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘लोकसत्ता ऑनलाइन’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2020 3:36 pm

Web Title: benefits of drinking buttermilk ssj 93
Next Stories
1 Apple iPad Air, iPad 8 लाँच; पाहा काय आहे विशेष
2 Apple Watch Series 6 लाँच; ब्लड ऑक्सिजन लेव्हल मॉनिटर फिचरचाही समावेश
3 बहुगुणी तीळ! जाणून घ्या, ‘हे’ १० फायदे
Just Now!
X