शरीरातील प्रत्येक क्रिया सुरळीत चालावी यासाठी शरीराला आहारासोबतच पाण्याचीदेखील तितकीच गरज असते. त्यामुळे दररोज ५ते ६ लीटर पाणी पिणे गरजेचे आहे. अनेकदा डॉक्टरदेखील पाणी पिण्याचा सल्ला देतात. मात्र, सध्याच्या घडीला अनेक जण फ्रिजमधील गार पाणी पितात. परंतु सतत गार पाणी प्यायल्यामुळं अनेक शारीरिक समस्या उद्भवण्याची शक्यता असते. तसंच गार पाणी पिण्यापेक्षा गरम किंवा कोमट पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. अनेक जण सकाळी उठल्यावर कोमट पाणी पितात. त्यामुळे कोमट पाणी पिण्याचे नेमके फायदे कोणते ते जाणून घेऊयात.

१. बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.

२. पोट साफ होतं.

३. छातीत अडकलेला कफ मोकळा होतो.

३. भूक कमी लागण्याची समस्या दूर होते.

४. वजन कमी होण्यास मदत मिळते.

५.घसा दुखत असल्यास आराम मिळतो.

६. चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर होतात.

७. केस लवकर पांढरे होत नाहीत.

८. सर्दी कमी होते.

९. पचनक्रिया सुधारते.

१०. शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात.

११. त्वचा लवचिक होते.