भारती एअरटेल फेब्रुवारीमध्ये देशातील दुसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी ठरली आहे. कंपनीने फेब्रुवारीमध्ये जवळपास 8.5 लाख नवीन ग्राहक मिळवले. तर, नंबर एक कंपनी रिलायन्स जिओकडे फेब्रुवारीमध्ये 62.5 लाख नवीन ग्राहक आले. टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI)च्या आकेडवारीमध्ये ही माहिती समोर आली आहे.

ट्रायच्या रिपोर्टनुसार, भारती एअरटेलचे एकूण सब्सक्राइबर्स 32.9 कोटी झाले आहेत. तर, रिलायन्स जिओ 38.28 कोटी सब्सक्राइबर्ससह पहिल्या स्थानावर कायम आहे. दुसरीकडे, एकूण वायरलेस सब्सक्राइबर्स (2जी, 3जी आणि 4जी एकत्र) जानेवारीच्या 115.64 कोटींहून वाढून फेब्रुवारीमध्ये 116.05 कोटी झाल्याचं ट्रायच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

व्होडाफोनने गमावले लाखो युजर्स :-
फेब्रुवारीमध्ये सरकारी कंपनी बीएसएनएलला 43 हजार नवीन ग्राहक मिळाले, त्यामुळे कंपनीची एकूण सब्सक्राइबर्सची संख्या 11.99 कोटी झाली. पण, व्होडाफोन-आयडियाला मात्र फटका बसला आहे. व्होडाफोन-आडियाची सेवा सोडणाऱ्या युजर्सची संख्या मोठी आहे. फेब्रुवारीमध्ये 34.6 लाख ग्राहकांनी कंपनीची सेवा सोडल्याचं समोर आलं आहे. यामुळे व्होडाफोन-आयडियाच्या ग्राहकांची संख्या कमी होवून 32.55 कोटी झाली आहे.