News Flash

कर्करोगग्रस्त रुग्णांनी अशी घ्या केसांची व त्वचेची काळजी!

घ्या, केसांची व त्वचेची काळजी

डॉ.रिंकी कपूर

गेल्या काही वर्षांमध्ये कर्करोगावरील उपचार पद्धतीमध्ये अमुलाग्र बदल झाल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे आता कर्करोगावर निदान करणारे अनेक उपचार पद्धती असल्याचं दिसून येतं. मात्र, या उपचार पद्धतीमध्ये रुग्णाला अनेक शारीरिक त्रास सहन करावा लागतो. यामध्ये केमोथेरपी केल्यावर रुग्णाचे केसगळताना पाहायला मिळतात. तसंच अनेकदा शल्यक्रिया, रेडिएशन थेरपीचा वापर, स्टिरॉइड्स आणि इतर एजंट्सचा वापर केल्यामुळे त्याचा परिणाम रुग्णाच्या त्वचेवर आणि केसांवरही होताना दिसतो.

कर्करोगाच्या रूग्णांमध्ये त्वचेचा रंग, कोरडेपणा, मुरुम, सूर्यप्रकाशाची संवेदनशीलता, खाज सुटणे, घसा, पिलिंग, एलर्जी, हायपरपिग्मेन्टेशन, अलोपिसीया (केस गळणे), केसांची कोरडी आणि खाज येणारी त्वचा केस अकाली पांढरे होणे या दृष्टीने अनेकदा दिसतात. कर्करोगाच्या रूग्णांना बरे होण्यासाठी त्वचेची आणि केसांची निगा राखणे अधिक आवश्यक आहे आणि कर्करोगाच्या उपचारांपूर्वी तसेच उपचारा दरम्यान आणि नंतर त्वचेची आणि केसांची निगा राखण्याबाबत त्यांनी अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे.त्यामुळेच कर्करोगग्रस्त रुग्णांनी त्यांच्या केसांची व त्वचेची काळजी कशी घ्यावी हे जाणून घेऊयात.

१. पहिली पायरी म्हणजे आपल्या संवेदनशील त्वचेसाठी आपल्या दैनंदिन मॉइस्चरायझिंग रूटीन कायम ठेवणे. सौम्य, हायड्रेटिंग आणि हायपोलेर्जेनिक उत्पादने वापरून पहा.

२. सुगंधित, अल्कोहोलयुक्त, प्रीझर्वेटीव्ह,इसेंशिअल ऑईल यासारखी उत्पादने वापरू नका कारण त्यात एलर्जीन आहे आणि यामुळे त्वचेची जळजळ होऊ शकते.

३. जास्त गरम पाण्याने अंघोळ करु नका. त्यामुळे त्वचेतील आर्द्रता कमी होते.

४. शॉवरिंगच्या १० मिनिटांत हायड्रेटिंग मॉइश्चरायझर लावा.

५. हातापायांची निगा राखा.

६. अमोनियम लेक्टेट असलेली क्रिम त्वचेतील ओलावा वाढवते त्यामुळे कोरड्या त्वचेसाठी ती फायदेशीर आहे.

७. कर्करोगाच्या रुग्णांना सूर्यापासून संरक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. बाहेर जाताना नेहमीच एक चांगले एसपीएफ असलेले सनस्क्रीन लावा आणि सनस्क्रीनमध्ये झिंक ऑक्साईड, टायटॅनियम डायऑक्साइड किंवा एव्होबेन्झोन असावे. बाहेर जाण्यापूर्वी टोपी, हातमोजे, संरक्षणात्मक चष्मा घाला. दर दोन तासांनी पुन्हा सनस्क्रीन लावा.

८. स्क्रब, एएचए, रेटिनॉल आणि ग्लाइकोलिक एसिड वापरणे थांबवा.

९. मुरुमांवर उपचार करण्यासाठी तोंडावाटे घेण्यात येणारी प्रतिजैविक किंवा सौम्य एंटीकॅसिन क्रीम वापरा. ओटीसी क्रीम खरेदी करू नका ज्यात बेंझॉयल पेरोक्साईड किंवा सॅलिसिक एसिड यांचा समावेश असेल ते त्वचा कोरडी करतात. कर्करोगाचा उपचार थांबल्यानंतरही त्वचेची योग्य काळजी घ्या आवश्यक असल्यास तज्ञ डॉक्टरांना भेट द्या.

(लेखिका डॉ. रिंकू कपूर या द एस्थेटिक क्लिनिक्स’च्या त्वचारोग सल्लागार आणि कॉस्मेटिक त्वचारोग तज्ज्ञ आहेत.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 22, 2020 4:05 pm

Web Title: cancer protect your skin and hair ssj 93
Next Stories
1 जिओचं नवं ‘JioPages’ मेड इन इंडिया ब्राउझर लॉन्च; आठ भारतीय भाषांमध्ये उपलब्ध
2 दसरा-दिवाळीसाठी नवीन गाडय़ा
3 बाजारात नवीन काय? : आभासी दालन
Just Now!
X