साखरयुक्त शीतपेये व सोडा यामुळे मूत्रपिंडाचे विकार जडतात असे एका अभ्यासात दिसून आले आहे. क्लिनिकल जर्नल ऑफ अमेरिकन सोसायटी ऑफ नेफ्रॉलॉजी या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या शोधनिबंधात म्हटले आहे की, साखरयुक्त शीतपेयांनी वाईट परिणाम होतात. जॉन हॉपकिन्स ब्लूमबर्ग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ या अमेरिकेतील संस्थेने ३००३ आफ्रिकन अमेरिकन महिला व पुरूषांची तपासणी केली. शीतपेयांचे आरोग्यावर कुठले वाईट परिणाम होतात याबाबत कुठलीही ठोस माहिती उपलब्ध नसल्याने हे संशोधन महत्त्वाचे आहे असे जॉन्स हॉपकिन्स ब्लूमबर्ग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या कॅसी रेबहोल्झ यांनी म्हटले आहे. शीतपेयींचे प्रकार, त्यांच्यातील घटक व त्याचा मूत्रपिंडांवर होणारा परिणाम याचे सखोल संशोधन करणे महत्त्वाचे होते. दहा वर्षे काही रुग्णांचा अभ्यास करून व त्यांना अन्नाबाबत प्रश्नावली देऊन हा अभ्यास करण्यात आला. ३००३ व्यक्तींपैकी १८५ टक्के लोकांमध्ये मूत्रपिंडाचे आजार हे शीतपेयांमुळे दिसून आले, शीतपेये, फळांचा शर्करायुक्त रस यामुळे मूत्रपिंडाचे विकार होण्याची जोखमी ही ६१ टक्के अधिक असते. या शीतपेयांमध्ये पाण्याचाही समावेश असून पाण्यात रसायने मिसळल्याने मूत्रपिंडाचे आजार होण्याचे प्रमाण वाढत असते. यात अनेकदा पाण्याचा दर्जाही महत्त्वाचा ठरतो. या अभ्यासातील लोकांनी त्यांच्या दहा वर्षांच्या संबंधित काळात मोठय़ा प्रमाणावर फळ पेये. शीतपेये यांचे सेवन केले होते.