Corona Virus Covid 19 : करोना व्हायरसच्या वाढत्या प्रदुर्भावामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात २१ दिवसांचा लॉकडाउन घेतला आहे. या महामारीमळे विविध देशांत आतापर्यंत १५ हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालाय. भारतात आतापर्यंत सातशे जणांना करोनाची लागण झाली आहे. तर या आजारामुळे भारतात १६ जणांचा मृत्यू झाला आहे. करोनावर मात करण्यासाठी भारत सरकारने पूर्ण व्यवस्था केली आहे. मात्र एक नागरिक म्हणूनही आपली काही कर्तव्य आणि जबाबदारी असते.

जगातील करोनाचा वाढता संसर्ग पाहाता भविष्यात भारतात या रोगाचा संसर्ग वाढण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे अनेकांच्या खिशाला झळ बसू शकते. या रोगावर सध्या कोणतीच गौळ्या-औषधं उपलबद्ध नाहीत. संसर्ग झाल्यानंतर सुरूवातीच्या काळातच हा रोग आटोक्यात येत असल्याचं आतापर्यंत समोर आलं आहे. पण उशीर झाल्यास या रोगावर तुर्तास तरी उपचार शक्य नाही. अशातच करोनावर उपचार करणायासाठी लागणाऱ्या पैशातून वाचण्यासाठी अवघ्या ४९९ रूपयांचा विमा तुम्ही घेऊ शकता.

Clinikk Healthcare नं करोनावर मात करण्यासाठी ४९९ रूपयांचा विमा कवच आणलं आहे. हा विमा घेतल्यास तुमचा मोठा खर्च वाचणार आहे. या ४९९ रूपयांच्या करोना विम्यानुसार संसर्ग झालेल्या रूग्ण आणि त्याच्या कुटुंबाना पुर्णपणे उपचार करण्याची सुविधा आहे. संसर्ग झाल्यास त्यानिगडित सर्व खर्चाची रक्कम विमा कंपनी तुम्हाला देणार आहे.

४९९ रूपयांच्या विमा प्लॅनमध्ये प्राथमिक काळजी आणि आर्थिक खर्च कंपनी उचलणार आहे. त्यासोबतच 24×7 तज्ञ्ज डॉक्टांराची कंसल्टेशन मदत मिळणार आहे. त्याशिवाय जर करोना व्हायरसच्या रूग्णालयात दाखल झाल्यास कोरोना संक्रमित पीडिताला एक लाख रूपयांचा विमा कव्हर मिळेल. रूग्णालयात दाखल झालेला सर्व खर्च यातूनच केला जाईल.

https://app.clinikk.com/ संकेतस्थळावर जाऊन तुम्ही विमा कवच घेऊ शकता. विमा कवच घेण्यासाठी त्यांच्या काही कागदपत्र आणि प्रश्नांच्या उत्तराची पुर्तता तुम्हाला करावी लागणार आहे.