डॉ. प्रदीप महाजन

सध्या संपूर्ण जगभरात ‘मध्य पूर्व रेस्पीरी सिंड्रोम’ (एमईआरएस) आणि ‘गंभीर तीव्र श्वसन सिंड्रोम’ (एसएआरएस) यांसारख्या आजारांच्या रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. त्यातच आता करोना विषाणून या नव्या आजाराने थैमान घातलं आहे. आतापर्यंत या आजारामुळे अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे या विषाणूविषयी जागृकता बाळगणं गरजेचं आहे. कोविड-19 हा संसर्गजन्य आजार आहे. रोगप्रतिकारशक्ती कमी असणाऱ्यांना या आजाराची पटकन लागण होत आहे. यामुळे या आजाराचा सर्वांधिक धोका वृद्ध व्यक्तींना आहे. याशिवाय लहान मुलांचीही तितकीच काळजी घेण्याची गरज आहे. खासकरुन जी मुलं ऑटिझम आहेत त्यांना या आजाराविषयी माहिती देण्याची आणि त्यापासून स्वत:ची काळजी कशी घ्यावी याचं मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे.

करोना हा अतिशय घातक विषाणू असून प्रचंड वेगाने पसरत आहे. परंतु, याची लागण हवेमार्फत होत नसून संसर्गातून किंवा वस्तूच्या स्पर्शातून होत आहे. तसेच ऑटिझम मुलांमध्ये विषाणूच्या एकूण वर्तनाची तुलना अन्य संसर्गासारख्या (श्वसनासंदर्भातील विकार) आजाराशी करता येते. साधारणतः सर्वसामान्य व्यक्तींच्या तुलनेत ऑटिझम मुलांना करोना व्हायरससंदर्भातील मार्गदर्शन करणं अवघड काम आहे. परंतु, या विषाणूच्या प्रादुर्भावापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी त्यांना काही गोष्टी शिकवणं आणि त्यांच्या आरोग्यासाठी आपण काही गोष्ट करणं गरजेचं आहे.

१. या मुलांना हात स्वच्छ धुवणे, सामाजिक अंतर, सामान्य पृष्ठभागास स्पर्श करणे टाळे, शौचालय प्रशिक्षण अशा गोष्टींचे महत्त्व समजावून सांगणे आवश्यक आहे.

२. मास्कचा वापर कसा करावा, शारीरिक स्वच्छता कशी राखावी आणि शिंकताना किंवा खोकताना रूमालाचा वापर करणे किती गरजेचं आहे, हे या मुलांना छायाचित्राच्या माध्यमातून समजावून सांगितले पाहिजे.

३. जर मुलांना हे शिकवणं शक्य नसेल किंवा जमत नसेल तर केअरटेकरची मदत घ्या. ज्यामुळे मुलाची काळजी योग्य पद्धतीने घेतली जाईल.

४. लॉकडाउन म्हणजे काय? हे मुलांना समजवायचा प्रयत्न करा म्हणजे ते घराबाहेर पडण्याचा अट्टाहास करणार नाहीत.

५. या काळात त्यांच्याशी जास्तीत जास्त बोलण्याचा प्रयत्न करा. चित्रांच्या माध्यमातून त्यांच्यात करोनाविषयी जागृती निर्माण करा.

ऑटिझम म्हणजे नेमकं काय?

ऑटिझम हा बालपणात मज्जातंतूच्या विकासाशी (न्यूरो डेव्हलपमेंट) संबंधित विकार आहे. या आजाराला वैद्यकीय भाषेत ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर (एएसडी) असे म्हणतात. मेंदूत घडलेल्या काही न्यूरोलॉजिकल हालचाली किंवा संसर्गामुळे ऑटिझम अवस्था घेऊन मुले जन्माला येतात. ऑटिझम मुलांमध्ये रोगप्रतिकारशक्ती खूप कमी असल्याने त्यांना विविध आजारांचा संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे या मुलांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. जेणेकरून त्यांना विषाणूची लागण होण्यापासून वाचवता येईल.

(डॉ. प्रदीप महाजन हे मुंबईतील स्टेम आरएक्सचे रिजनरेटिव्ह मेडिसीन रिसर्चर आहेत.)