News Flash

Good News! भारतात High Speed इंटरनेट सेवा देणार एलन मस्कची कंपनी Starlink, प्री-बूकिंगसह रजिस्ट्रेशन झालं सुरू

दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, हैदराबाद आणि बंगळुरूमध्ये प्री-बूकिंगला झाली सुरूवात

(पंतप्रधान मोदी आणि एलन मस्क यांचे संग्रहित छायाचित्र, पीटीआय)

‘टेस्ला’ या जगप्रसिद्ध इलेक्ट्रिक कार कंपनीचे सीईओ एलन मस्क आता भारतात रिलायन्स जिओ आणि अन्य टेलिकॉम कंपन्यांना टक्कर देण्याच्या तयारीत आहेत. एलन मस्क यांची दुसरी कंपनी starlink लवकरच भारतात इंटरनेट सेवा सुरू करणार आहे, यासाठी रजिस्ट्रेशनलाही सुरूवात झाली आहे. Starlink इंटरनेटची सेवा SpaceX कंट्रोल करते, SpaceX ही एक एअरोस्पेस कंपनी असून अंतराळात शोध व सेवा देण्यासाठी मस्क यांनी 2002 मध्ये SpaceX ची स्थापना केली होती. सॅटेलाइट्सद्वारे ही कंपनी हाय-स्पीड इंटरनेट सेवा पुरवणार आहे.

प्री-बूकिंगसह रजिस्ट्रेशनला सुरूवात :-
भारतात इंटरनेट सेवा देण्यासाठी Starlink इंडियाची वेबसाइट लाइव्ह झाली असून बूकिंगलाही सुरूवात झाली आहे. रिपोर्ट्सनुसार, भारतात स्टारलिंकची इंटरनेट सेवा 2022 मध्ये सुरू होऊ शकते. मात्र, कनेक्शन घेण्यासाठी प्री-बूकिंगला सुरूवात झाली आहे. https://www.starlink.com/ या लिंकवर जाऊन तुम्ही प्री-बूकिंग करु शकतात. स्टारलिंक इंटरनेटसाठी प्री-बूकिंग सध्या दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, हैदराबाद आणि बंगळुरूमध्ये सुरूवात झाली आहे.

किती असणार दर?:-
प्री-बूकिंगसाठी 99 डॉलर म्हणजे जवळपास 7 हजार 300 रुपये सिक्युरिटी म्हणून द्यावे लागतील, हे पैसे राउटर आणि अन्य बाबींसाठी असतील. पेमेंट झाल्यानंतर तुमच्या लोकेशनवर बूकिंग कन्फर्म होईल. सिक्युरिटी म्हणून दिलेले पैसे १०० टक्के रिफंडेबल आहेत, म्हणजे बूकिंग केल्यानंतरही तुम्ही बूकिंग रद्द करु शकतात, तुम्हाला सर्व पैसे परत दिले जातील.

स्पीड किती ?:-
दरम्यान, सुरूवातीला बीटा टेस्टिंगदरम्यान ग्राहकांना 50-150Mbps चा स्पीड मिळेल. टेस्टिंग पूर्ण झाल्यानंतर 300Mbps पर्यंत स्पीड मिळेल असं मस्क यांनी यापूर्वी सांगितलं होतं. Starlink द्वारे जगभरात इंटरनेट सेवा देण्याची मस्क यांची योजना आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 2, 2021 1:47 pm

Web Title: elon musks starlink satellite broadband service is coming to india check price how to pre order and availability sas 89
Next Stories
1 किंमत 3,599 रुपये; जाणून घ्या कसे आहेत Nokia Power Earbuds Lite?
2 Covid 19 व्हॅक्सिन: चुकीची माहिती पसरवल्यास Twitter करणार कारवाई, कायमस्वरुपी ब्लॉक होऊ शकतं अकाउंट
3 Atum 1.0 : स्वस्त इलेक्ट्रिक बाइकच्या डिलिव्हरीला आजपासून सुरूवात
Just Now!
X