21 January 2018

News Flash

रक्तदात्यांनो, फेसबुकच्या नव्या फिचरबद्दल आवर्जून जाणून घ्या!

रक्तदान श्रेष्ठदान

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: October 2, 2017 2:52 PM

१ ऑक्टोबरपासून फेसबुकने एक नवं फीचर आणलं आहे

फक्त एकमेकांशी संवाद साधणं एवढाच फेसबुकचा उपयोग न राहता फेसबुकची व्याप्ती हळूहळू वाढत चालली आहे. फेसबुकसारखं मोठं व्यासपीठ एखाद्या नवख्या कलाकाराला प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचू शकतं, एखाद्या व्यावसायिकाच्या व्यवसायाला प्रगतीचा वेग याच फेसबुकमुळे मिळतो. अडीअडचणीच्या वेळी गरजूंपर्यंत लाखो मदतीचे हात फेसबुकमुळेच पोहोचतात, आणि समाजसेवेत मोलाचं पाऊल उचलत १ ऑक्टोबरपासून फेसबुकने एक नवं फिचर आणलं आहे. या फिचरच्या माध्यमातून तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या रक्तदात्यांची माहिती तुम्हाला मिळणार आहे.

Video : चोरीसाठी काहीपण, चोरट्याची करामत बघून तुम्ही व्हाल थक्क

फेसबुक युजर्सच्या न्यूज फीडमध्ये एक मेसेज युजरला येईल. त्यामाध्यमातून रक्तदात्यांना फेसबुकवर नोंदणी करता येईल. जर तुम्ही यापूर्वी रक्तदान केलं असेल तर तुम्ही फेसबुकवर नोंदणी करू शकता. तुमची माहिती फेसबुक गुप्त ठेवील किंवा तुम्ही ती माहिती आपल्या टाईमलाईनवर देखील शेअर करु शकता. जर एखाद्याला रक्ताची गरज असेल तर फेसबुकवर नोंदणी केलेल्या प्रत्येक रक्तदात्याला एक नोटीफिकेशन येईल. याद्वारे गरजूंना रक्तदात्यांशी थेट संपर्क साधता येणार आहे. फेसबुकच्या या नव्या उपक्रमाचे सर्वांकडून स्वागत होताना दिसत आहे.

First Published on October 2, 2017 1:41 pm

Web Title: facebook is trying to match blood donors india
  1. No Comments.