फेसबुकने एक नवीन चॅटिंग अ‍ॅप Tuned लाँच केले आहे. नवीन आणि वेगळ्या पद्धतीने आपल्या पार्टनससोबत चॅटिंगचा अनुभव मिळावा यासाठी हे अ‍ॅप कंपनीने विशेषतः ‘कपल्स’साठी आणले आहे.

फेसबुकच्या न्यू प्रोडक्ट एक्सपेरिमेंटेशन (NPE) टीमने हे अ‍ॅप बनवले असून सध्या केवळ अ‍ॅपल युजर्सनाच Tuned अ‍ॅप डाउनलोड करता येईल. युएस आणि कॅनडामध्ये अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवर हे अ‍ॅप उपलब्धही झाले आहे. Tuned अ‍ॅप म्हणजे तुमच्या सर्वात खास आणि महत्त्वाच्या नात्यासाठी असलेला ‘प्रायव्हेट स्पेस’ आहे, असे NPE ने म्हटले आहे.

ग्राहक-केंद्रीत एक्सपेरिमेंटल अ‍ॅप बनवण्यासाठी फेसबुकने गेल्या वर्षी NPE टीम तयार केली होती. फेब्रुवारी महिन्यात त्यांनी एक फोटो आणि व्हिडिओ शेअरिंग अ‍ॅप Hobbi लाँच केले होते. त्यानंतर आता Tuned अ‍ॅप आणले आहे. याद्वारे तुम्ही दिवसातील खास क्षण, लव नोट्स, फोटो, व्हॉइस नोट, गाणी इ. शेअर करु शकता. चॅटिंगला मजेदार बनवण्यासाठी यामध्ये स्टिकर्स आणि इमोजी देखील आहेत. हे पूर्णतः मोफत अ‍ॅप असून याचा वापर करण्यासाठी केवळ फेसबुकवर अकाउंटची आवश्यकता असेल. हे अ‍ॅप Spotify अकाउंटशी कनेक्ट करुन तुम्ही तुमच्या मूडनुसार गाणी किंवा प्ले-लिस्टही शेअर करु शकता. याशिवाय, अन्य काही आकर्षक फीचर्सही या अ‍ॅपमध्ये असल्याचं सांगितलं जात आहे. पण अद्याप त्याबाबत पूर्ण माहिती मिळालेली नाही.