भारतात ऑटोमोबाइल क्षेत्रामध्ये अभूतपूर्व मंदी पहायला मिळतेय, कार उत्पादनात सध्या 15 ते 20 टक्के कपात झालीये. केंद्र सरकार सध्या इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीला प्रोत्साहन देत असल्याने सामान्य वाहन क्षेत्रातील गुंतवणूक कमी झाली आहे. आता कार कंपन्या केंद्र सरकारने ठरवलेल्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याच्या नव्या नियमांनुसार अर्थात भारत स्टेज 6 (BS-VI) मानकांनुसार नव्या कार बाजारात उतरवण्याच्या तयारीत आहेत. येथे आम्ही तुम्हाला दिवाळीपूर्वी भारतीय बाजारात दाखल होण्यास सज्ज असलेल्या कार्सबाबत माहिती देणार आहोत.

Renault Triber –


Renault कंपनीची Triber ही मल्टी पर्पज व्हेइकल (MPV) प्रकारातील कार आहे. कंपनीच्या क्विड या कारच्या पुढील सेगमेंटमध्ये ही कार येते. त्यामुळे 5.3 लाख ते 8 लाख रुपयांपर्यंत या कारची किंमत असण्याची शक्यता आहे. ही कार दिवाळीआधी भारतीय रस्त्यावर धावताना दिसेल.

Maruti Suzuki S-Presso –


ही कार कंपनीने 2018 ऑटो एक्स्पोमध्ये सादर केली होती. ही कार सप्टेंबर महिन्यात भारतीय बाजारात लाँच होण्याची शक्यता आहे.

​Tata Altroz-


ही कार भारतीय बाजारात बलेनो आणि ह्युंडई इलाइट-i20 या कारला टक्कर देईल. ही कार देखील दिवाळीपूर्वी लाँच होण्याची शक्यता आहे.

Kia Seltos –

ही कार 22 ऑगस्ट रोजी लाँच होणार आहे. या कारसाठी 16 जुलै रोजी नोंदणी सुरू झाली आहे.

Hyundai Grand i10 –

कंपनीची ही लोकप्रिय कार असून पुढील काही महिन्यांमध्ये कंपनी ही कार लाँच करण्याची शक्यता आहे.