गुगल प्ले स्टोअरमधून काही अॅप मोबाइलमध्ये हेरगिरी करत आहेत. अमेरिकास्थीत सायबर सिक्युरीटी Trend Micro च्या एका अहवालानुसार कॅमेऱ्याशी निगडीत दोन डझनाहून जास्त अॅप युजर्सचे फोटो गोळा करतात आणि अश्लिल कंटेंट पाठवतात. हे अॅप युजर्सच्या मोबाइलवर हल्ला करण्यासाठी एका विशीष्ट सर्व्हरपर्यंत (किंवा रिमोट अॅड कॉन्फिगरेशन या सर्व्हरपर्यंत) पोहोचू शकतात. यातील अनेक अॅप्स लाखांहून अधिक वेळेस तर काही अॅप्स 10 लाखांहून जास्त वेळेस डाउनलोड करण्यात आले आहेत आणि त्यांनी अनेकांच्या फोटोंची चोरीही केली आहे.

मोबाइलच्या बॅकग्राउंडमध्ये हेरगिरीचं काम करतात हे अॅप –
Trend Micro ने अशाप्रकारच्या एकूण 29 ब्युटी कॅमेरा अॅप्सची यादी जाहीर केली आहे. केवळ भारतातच नाही तर परदेशातही हे अॅप्स डाउनलोड करण्यात आले आहेत. सेल्फी अजून आकर्षक करण्यासाठी बनवलेल्या अन्य एडिटिंग प्रोग्रामप्रमाणे हे अॅप्स असतात. पण मोबाइलच्या बॅकग्राउंडला राहून हे अॅप्स हेरगिरीचं काम करतात. या यादीत Pro Camera Beauty, Cartoon Art Photo, Beauty Camera, Selfie Camera Pro आणि Horizon Beauty Camera अशा अॅप्सचा समावेश आहे.

कशे चोरी करतात फोटो –
या 29 अॅप्समध्ये काही फोटो फिल्टर अॅप देखील आहेत. फोटो अधिक आकर्षक आणि दर्जेदार बनवण्यासाठी या अॅप्सचा वापर होतो. युजर जेव्हा कोणताही फोटो अपलोड करतो त्यावेळी हे फेक अॅप्स सर्व्हरवर अपलोड केलेला फोटो चोरी करतात. 29 अॅप्सपैकी 11 अॅप्स 1 लाखांहून अधिक जणांनी तर तीन अॅप्स 10 लाखांहून अधिक जणांनी डाउनलोड केले आहेत.

प्ले स्टोअरवरुन हटवले अॅप –
संशय बळावल्यानंतर गुगलने प्ले स्टोअरवरुन हे अॅप्स हटवले आहेत. जर तुम्हीही मोबाइलमध्ये ही अॅप्स ठेवले असतील तर तातडीने डीलिट करा.