06 December 2019

News Flash

गुगल मॅपवर पब्लिक टॉयलेटही शोधता येणार

हे फीचर आयओएस आणि अँड्रॉइड अशा दोन्ही डिव्हाइसवर उपलब्ध असेल.

एखादा रस्ता चुकलात किंवा एखादा पत्ता शोधायचा असेल, तर आपण हमखास गुगल मॅपचा उपयोग करतो. गुगल मॅपमुळे कोणतेही ठिकाण शोधण्यास सहजसोपं झाले आहे. एखाद्या नव्या ठिकाणी गेल्यास गुगल मॅपमध्ये तूम्ही पत्ता, चित्रपट गृह, स्टेशन, मॉल यासारख्या अनेक गोष्टी शोधता. गुगलने आपल्या ‘गुगल मॅप’ या अॅपमध्ये नवीन नेव्हिगेशन फीचर्स आणले आहे.

गुगल मॅपच्या साह्याने आता तुम्हाला सार्वजनिक शौचालय शोधता येणार आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत गुगलनं तब्बल ४५ हजार कम्युनिटी आणि सार्वजनिक शौचालये गुगल मॅप्सवर अॅड केली आहेत. हे फीचर आयओएस आणि अँड्रॉइड अशा दोन्ही डिव्हाइसवर उपलब्ध असेल.

मुंबई, पुणे, दिल्ली, चेन्नई आणि कोलकाता यासारथ्या देशभरातील १७०० शहरांमधील सार्वजनिक शौचालयाची माहिती गुगल मॅपवर अॅड केली आहे. गुगल मॅप या अॅपवर ‘पब्लिक टॉयलेट्स नीयर मी’ या नावाने हे फीचर असेल. दररोज प्रवास करणाऱ्यांसाठी गुगलने आणखी एक नवीन फीचर आणले आहे. यूजर्सना बाइक-शेअरिंग स्टेशनची माहिती दिली जाणार आहे.

याआधीही गुगल मॅपमध्ये तीन नवे फिचर्स अॅड करण्यात आले आहेत. मॅपवर तुम्हाला बसच्या प्रवासाची सगळी माहिती मिळेल. एखाद्या ठिकाणी पोहोचण्यासाठी किती वेळ लागणार याबाबतही कळेल. इतकंच नाही तर कुठे जास्त वाहतूक कोंडी आहे हे देखील समजू शकेल. गुगल लाइव्ह ट्रॅफिक डेटा आणि सार्वजनिक बस वाहतुकीचं वेळापत्रक यांच्या आधारे सर्व माहिती युजर्सना पोहोचवली जाईल.

आता रेल्वेचं लाइव्ह स्टेटस पाहण्यासाठी तुम्हाला रेल्वेचं संकेतस्थळ किंवा अन्य अॅपचा वापर जाण्याची गरज नाही. कारण आता गुगल मॅपवरच तुमच्या ट्रेनबाबतची सर्व माहिती मिळणार आहे. सध्या केवळ लांबपल्ल्यांच्या गाड्यांसाठीच हे फीचर कार्यान्वित आहे. Where is my Train या अॅपच्या मदतीने कंपनीने हे नवं फीचर सुरू केलं आहे. बस किंवा ट्रेनच्या प्रवासानंतर पुढील प्रवासाासठी रिक्षाचा वापर करणाऱ्यांना केंद्रीत करुन हे फीचर सुरू करण्यात आलं आहे. बस किंवा ट्रेन सोडल्यानंतर कोणत्या ठिकाणाहून रिक्षाचा प्रवास परवणारा असेल किंवा रिक्षाच्या प्रवासासाठी किती भाडं आकारलं जाणार अशाप्रकारची सर्व माहिती मिळेल. हे फीचर केवळ दिल्ली आणि बंगळुरुच्या युजर्ससाठी उपलब्ध असून लवकरच अन्य शहरांमध्येही ही सेवा सुरू करण्याचा गुगलचा प्रयत्न आहे.

First Published on July 19, 2019 1:22 pm

Web Title: google maps gets new features called public toilets and bike sharing station nck 90
Just Now!
X