गुगलच्या प्ले स्टोअरमध्ये असंख्य अॅप्स उपलब्ध आहेत. अँड्रॉइड युजर्ससाठी हे सर्व अॅप्स डाउनलोड करणं अगदी सोपं आहे. मात्र, हे अॅप्स इंस्टॉल करताना खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. कारण, प्ले स्टोअरवरील अनेक अॅप्समध्ये धोकादायक व्हायरस आढळल्याचे प्रकार समोर आलेत. आता पुन्हा एकदा 24 धोकादायक अॅप्समध्ये खतरनाक मॅलवेअर आढळल्याची माहिती असून गुगलने हे अॅप्स प्ले स्टोअरवरुन हटवले आहेत. सायबर सिक्युरिटी वेबसाइट VPNPro ने या धोकादायक अॅप्सबाबत माहिती दिली होती. डिलिट केलेले हे अॅप्स जगभरात तब्बल 38 कोटींहून अधिक युजर्सनी डाउनलोड केले आहेत. यातील बहुतांश अॅप्स Shenzhen HAWK नावाच्या चिनी कंपनीद्वारे बनवण्यात आले होते. डिलिट केलेले अॅप्स गुगलच्या पॉलिसीचंही उल्लंघन करत होते. एक नजर मारुया कोणते अॅप्स हटवले - 1-World Zoo 2-Puzzle Box 3-Word Crossy! 4-Soccer Pinball 5-Dig it 6-Laser Break 7-Word Crush 8-Music Roam 9-File Manager 10-Sound Recorder 11-Joy Launcher 12-Turbo Browser 13-Weather Forecast 14-Calendar Lite 15-Candy Selfie Camera 16-Private Browser 17-Super Cleaner 18-Super Battery 19-Virus Cleaner 2019 20-Hi Security 2019 21-Hi VPN, Free VPN 22-Hi VPN Pro 23-Net Master 24-Candy Gallery