गेल्या वर्षीपासून ‘गुगल प्लस’ बंद करण्याचा निर्णय गुगल कंपनीने घेत होता. आता गुगल प्लस केव्हा बंद होणार याची तारीख समोर आली आहे. फेसबुकच्या वाढत्या लोकप्रियतेला पर्याय म्हणून अमेरिकन कंपनीने सात वर्षांपूर्वी गुगल प्लसची निर्मीती केली होती. परंतु गुगलची ही सेवा लोकांच्या मनात घर करण्यास फारशी यशस्वी ठरली नाही. म्हणून व्यवस्थापकांनी ग्राहकांना आणखी सेवा देण्यावर भर दिली होती. पण त्यांच्या या प्रयत्नांना यश आले नाही.

फेब्रुवारी २०१९ पासून गुगल प्लसचे अनेक फिचर बंद करण्यात आले होते. ‘9To5Google’ च्या रिपोर्टनुसार, ‘Inbox for Gmail’ अॅप वापरणाऱ्या ग्राहकांना गुगल प्लस २ एप्रिलला बंद होणार असल्याचे नोटीफिकेश पाठवण्यात आले आहे. तसेच ‘तुमचे आवडते इनबॉक्स फिचर’ मेन अॅपमध्ये आहेत असेही नोटीफिकेशनव्दारे सांगीतले आहे.

ज्या ग्राहकांना त्यांचा डेटा आणि माहिती नको आहे त्यांनी गुगल प्लसचे खाते नष्ट करावे अशी सुचनाही कंपनीव्दारे देण्यात आल्या आहेत. ‘गुगल प्लस’वरील सर्वच माहिती अर्काइव्हमध्ये साठवून ठेवण्यात येणार नसल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे. तसेच कमी रिझोल्युशनचे फोटो आणि व्हिडिओ साठवून ठेवू शकता असेही गुगलनं म्हटलं आहे. गुगल प्लसची सेवा का बंद करण्यात आली आहे याचा खुलासा अद्याप झालेला नाही.

मार्च २०१८ मध्ये गुगल प्लसवरून ५ लाख लोकांचा गोपनीय डेटा चोरीला गेल्याचे गुगलच्या निर्दशनास आले होते. २०१५ पासून ही डेटा चोरी सुरू होती. त्यानंतर गुगलचे सायबर सुरक्षा पथक कामाला लागले होते आणि ही चोरी थांबली होती.

गुगल प्लसचे खाते कसे नष्ट करावे?

– plus.google.com/downgrade वर क्लिक करा

– तुमचा आयडी आणि पासवर्ड टाका

– गुगल सेवा खंडित करण्याचा पर्याय दिसेल. तेथील ‘गुगल प्लस’ हा पर्याय निवडा.

– नंतर गुगल प्लस खाते नष्ट करण्याच्या पर्यायावर क्लिक करा.

-क्लिक करताच प्रोफाइल नष्ट होण्याची प्रकिया सुरू होईल.

– उघडलेल्या विंडोच्या खाली बरोबर अशी खुण करा आणि ‘Delete Google +’ हा पर्याय निवडा.

वरील दिलेल्या प्रकीयेनंतर तुमचे गुगल प्लसचे खाते नष्ट होईल आणि त्याचा संदेश तुमच्या स्क्रीनवर दिसेल.