25 November 2020

News Flash

लहान मुलांची माहिती गोळा करणारी अ‍ॅप्स गुगलने प्ले स्टोअरवरुन हटवली

गुगलने यापूर्वी नियमभंग करणारी ही १७ अॅप्स हटवली आहेत.

प्रातिनिधीक छायाचित्र

स्मार्टफोन्स वापरताना अनेक मजेशीर अॅप्स आपल्या पुढ्यात असले तरी सध्या सायबर क्राइमचा जमाना असल्याने ही अॅप काळजीपूर्वक वापरणे आवश्यक आहे. फोन वापरताना पौढ व्यक्तींनी स्वतःसह मुलांच्या सुरक्षेची काळजी घेणं गरजेचं आहे. कारण, अँन्ड्रॉईड फोनमधील तीन लोकप्रिय अॅप्स अनधिकृतरित्या लहान मुलांची माहिती गोळा करीत असल्याचं समोर आलं आहे. नियमांचं उल्लंघन झाल्याने गुगलने ही अॅप्स प्ले स्टोअरवरुन हटवली आहेत.

‘प्रिन्सेस सलून’, ‘नंबर कलरिंग’ आणि ‘कॅट्स अँड कॉसप्ले’ या तीन लोकप्रिय अॅप्सबाबत इंटरनॅशनल डिजिटल अकाउंटिबिलिटी काउन्सिलने (आयडीसीए) काळजी व्यक्त केली आहे. ही अॅप्स प्ले स्टोअरच्या धोरणांचा नियमभंग करुन युजर्सचा डेटा गोळा करीत होती. यामध्ये लहान मुलांच्या माहितीचा बहुतकरुन समावेश होता. हा डेटा या अॅप कंपन्यांकडू थर्ड पार्टीला दिला जात होता. या अॅप कंपन्यांकडून सातत्याने होत असल्याचा हा प्रकार आयडीएसीच्या रिसर्च टीमच्या लक्षात आलं. त्यामुळे या टीमने या तीन अॅप्सच्या कृतीबाबत गुगलला माहिती दिली. आयडीएसीचे अध्यक्ष अॅड. क्वेन्टिन पालफ्रे यांनी टेक क्रन्च या अमेरिकन वेब पोर्टलशी बोलताना ही माहिती दिली. इंडिया टुडेने याबाबत माहिती दिली आहे.

गुगलनेही टेक क्रन्चला याबाबत स्पष्टीकरण देताना सांगितले की, “आम्ही अहवालात सांगितलेली अ‍ॅप्स प्ले स्टोअरवरुन हटवण्यात आली आहेत. जेव्हा जेव्हा आम्हाला आमच्या धोरणांचे उल्लंघन करणारा अॅप आढळतो तेव्हा आम्ही त्यावर कारवाई करतो. या अॅप्सकडून कुठल्या प्रकारचा डेटा गोळा केला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. ही अॅप्स लहान मुलांकडून वापरली जातात. यातून गेम्सच्या माध्यमातून शिक्षणाचे काम केले जाते. या तीन अॅप्सवर कारवाई करण्यात आली असली तरी यासारखी इतर अॅप्स जी गुगल आणि अॅपलने तयार केली आहेत ती प्ले स्टोअरवर उपलब्ध असतील, असेही गुगलने स्पष्ट केले आहे.

गुगलने हटवली ही १७ अॅप्स

गुगलने आपल्या प्ले स्टोअरवरुन अशा प्रकारे अॅप हटवल्याची ही पहिलीच वेळ नाही, यापूर्वीही अनेकदा गुगलने संशयास्पद अॅप हटवले आहेत. अशाच प्रकारे गुगलने बंद केलेली १७ अॅप्स पुढीलप्रमाणे आहेत. ती अजूनही तुमच्या मोबाईलमध्ये असेल तर तात्काळ डिलिट करा.
All Good PDF Scanner, Mint Leaf Message -Your Private Message, Unique Keyboard – Fancy Fonts & Free Emoticons, Tangram App Lock, Direct Messenger, Private SMS, One Sentence Translator – Multifunctional Translator, Style Photo Collage, Meticulous Scanner, Desire Translate, Talent Photo Editor – Blur focus, Care Message, Part Message, Paper Doc Scanner, Blue Scanner, Hummingbird PDF Converter – Photo to PDF, All Good PDF Scanner.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 24, 2020 2:18 pm

Web Title: google removes 3 popular apps from play store that were collecting data of kids aau 85
Next Stories
1 काकडीबरोबरच तिच्या बियांचेदेखील आहेत गुणकारी फायदे; जाणून घ्या कसे
2 व्हॉट्सअॅपचं नवं फिचर, चॅट कायमचं म्यूट करण्याचा पर्याय
3 दसरा-दिवाळीपूर्वी एसबीआयचा ग्राहकांना खास संदेश
Just Now!
X