शहरात राहणाऱ्या अनेकांना आजही गावाकडची भाजी-भाकरी मनापासून आवडते. यामध्येच बाजरीची भाकरी, वांग्याची भाजी आणि खर्डा या अस्सल गावरान जेवणाची भूरळ तर विदेशातल्या लोकांनाही असल्याचं पाहायला मिळतं. मात्र, अनेक जण वांग्याची भाजी मनापासून खात नाही. खरंतर वांग्यामध्ये अनेक गुणकारी तत्व आहेत. वांगी हे जवळपास २ ते ३ प्रकारची असतात. यामध्ये भरताची म्हणजेची मोठी वांगी आणि लहान वांगी सर्वाधिक वापरली जातात. त्यामुळे वांगी खाण्याचे नेमके फायदे कोणते ते जाणून घेऊयात.

१. वजन नियंत्रणात येतं.

२. उच्च रक्तदाबाची समस्या कमी होते.

३. मधुमेहींसाठी फायदेशीर

४. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते.

५. त्वचा तजेलदार होते.

६. मेंदूचा विकास होतो.

७. धुम्रपानाचं व्यसन कमी होते.