26 January 2021

News Flash

अ‍ॅसिडीटीचा त्रास होतोय? मग जाणून घ्या ‘या’ १२ लक्षणांविषयी

अ‍ॅसिडीटी झाल्याचं कसं ओळखावं?

डॉ. रूचित पटेल

एखादा पदार्थ आवडत नाही म्हणून न खाणं किंवा एखादा पदार्थ आवडतोय म्हणून अतिप्रमाणात खाणं हे चुकीचं आहे. बऱ्याचदा अनेक जण आवड असलेले पदार्थ जास्त प्रमाणात खातात, मग भूक असो किंवा नसो. पण भूक नसताना खाल्ल्याने ‘अ‍ॅसिडीटी’ म्हणजेच ‘आम्लपित्ता’चा त्रास सतावू शकतो. कारण गरज नसताना खाल्ल्याने अपचन होऊन पित्ताचा त्रास होतो. त्यामुळे कोणताही पदार्थ खाताना तो प्रमाणात खाल्ला पाहिजे, असं तज्ज्ञ डॉक्टर सांगतात. त्यातच अनेकदा अ‍ॅसिडीटी झाल्याचं लोकांच्या लक्षात येत नाही. परंतु, अ‍ॅसिडीटी झाल्यावर त्याची काही लक्षणं जाणवतात. त्यामुळे ही नेमकी लक्षणं कोणती ते जाणून घेऊ.

अ‍ॅसिडीटीची प्रमुख लक्षणे

१. मळमळणे

२. डोके दुखणे,

३. तोंडाची चव कडवट होणे

४.पोटात जळजळ होणे

५. छातीत आग होणे

६.डोळ्यांची जळजळ होणे

७. उलटी होणे

८. वारंवार आंबट कडू पाणी तोंडात येणे

९. अस्वस्थ वाटणे

१०.करपट ढेकर येणे

११.चक्कर येणे

१२. अंगाला खाज सुटणे

(लेखक डॉ. रूचित पटेल हे मुंबईतील वोक्हार्ट रूग्णालयात गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट सल्लागार आहेत.)

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2020 12:20 pm

Web Title: health tips know everything about acidity ssj 93
Next Stories
1 ‘स्वस्त’ Poco स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी, पाच कॅमेऱ्यांसह 5000mAh ची दमदार बॅटरी
2 …जाणून घ्या गौरी आवाहनाची परंपरा
3 ‘स्वस्त’ OnePlus Nord खरेदी करण्याची आज संधी, दुपारी 1 वाजेपासून ‘फ्लॅश-सेल’
Just Now!
X