21 October 2020

News Flash

एक छोटीशी वेलची, पण मोठे फायदे

वेलचीचे खाण्याचे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

वेलचीमध्ये दोन प्रकार आहेत. दोन्हींचे गुणधर्म सारखे आहेत. वेलदोडा जुनाट व किडका नसावा. गरज तेव्हाच ताजा वेलदोडा आणावा. वेलची गुणाने रूक्ष, कफ, पित्त दोन्हींवर काम करणारी, शरीराला हलकेपणा आणणारी आहे. वेलची थंड का उष्ण हा वादाचा भाग आहे. रक्तविकार, तहान, मळमळ, उचकी, कोरडा खोकला, मूत्रविकार, डोळय़ांचे विकार, केसांचे व डोक्याचे विकार, शरीराचा दाह, हृद्रोग, आर्तवविकार, मुखविकार इत्यादी विविध विकारांत वेलचीचा उपयोग आहे.

वेलचीचे दाणे भाजून त्याचे चूर्ण घेतल्यास उचकी व उलटी थांबते. लघवीतून व योनीतून रक्तस्राव होत असल्यास वेलची चूर्णाचा लगेच उपयोग होतो. दरुगधी जखमांवर वेलची चूर्ण व तूप किंवा खोबरेल तेलाची पट्टी ठेवावी. जखम लवकर भरून येते. पोटफुगी या विकारात वेलची दाणे हिंगाबरोबर मिसळून खावे. ज्या पुरुषांचा लैंगिक दुबळेपणा आला असेल त्यांनी, वारंवार स्वप्नदोष होणाऱ्यांनी तुपाबरोबर नियमितपणे वेलची चूर्ण घ्यावे. शुक्रधातूचे कार्य सुधारते. वेलची मूत्रप्रवृत्ती साफ करते. त्याकरिता डाळिंब किंवा दह्याबरोबर वेलची चूर्ण खावे.

वेलची अत्यंत पाचक आहे. जडान्न, तुपाचे अजीर्ण, खूप ढेकरा याकरिता तीन-चार वेलदोडे दोन कप पाण्यात उकळून अष्टमांश काढा करून प्यावा. कोणत्याही पदार्थात सुगंधी म्हणून वेलचीचा जसा वापर आहे तसेच शरीरात थंडावा आणण्याकरिता वेलची सर्वत्र वापरावी. गर्भवती स्त्रीने वेलची फार खाऊ नये. रात्री वेलची खाणे टाळावे. सीतोपलादि चूर्णातील एक घटकद्रव्य वेलची हे आहे. दुर्धर गँगरिनसारख्या विकारात मधुमेही विकारात वापरल्या जाणाऱ्या एलादी तेलात, तसेच कोरडा खोकला, आवाज बसणे याकरिता प्रसिद्ध असलेल्या एलादी वटी या औषधात वेलची दाणे हे प्रमुख घटकद्रव्ये आहेत. लहान प्रमाणात वेलची खाल्ल्यास उलटी थांबते. खूप प्रमाणात खाल्ल्यास उलटी होते. हे लक्षात असावे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2020 3:51 pm

Web Title: healthy benifits of cardamon nck 90
Next Stories
1 झोपेचं गणित चुकतंय ? ‘हे’ उपाय करुन बघा
2 व्यसनमुक्त होण्यासाठी Lockdown चा काळ उत्तम; करा ‘हे’ घरगुती उपाय
3 धूम्रपान सोडण्यासाठी करा हे उपाय..
Just Now!
X