दुचाकी क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी हिरो मोटोकॉर्पच्या (Hero Motocorp) स्कुटर आणि बाइक महाग होणार आहेत. कंपनीने स्कुटर आणि बाइकच्या किंमतीत किमान दोन हजार रुपयांची वाढ केली आहे. प्रत्येक गाडीच्या किंमतीमागील दरवाढ वेगवेगळी असेल. एक जानेवारी 2020 पासून कंपनीच्या गाड्या महाग होणार आहेत.

किंमत वाढवण्याचं कोणतंही कारण कंपनीकडून देण्यात आलेलं नाही. पण, प्रदूषणाला आळा घालण्यासाठी भारतात एक एप्रिल 2020 पासून BS-6 मानक लागू होत आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच हीरो मोटोकॉर्पने अनेक BS-4 वाहनांचं प्रोडक्शन बंद केलंय. सामान्यतः जानेवारी किंवा जुलै महिन्यात वाहनांच्या किंमती वाढतात. किंमतीत वाढ होण्यासाठी अनेकदा प्रोडक्शन खर्चातील वाढ हे कारण असते. पण, नव्याने लागू होत असलेले बीएस-6 मानक किंमत वाढीसाठी मोठं कारण असल्याचं म्हटलं जातंय.

आणखी वाचा- Yamaha ची लोकप्रिय स्पोर्ट बाइक R15 , बीएस-6 इंजिनसह झाली लाँच

इतर कंपन्याही वाढवू शकतात किंमत –
भारतात एक एप्रिल 2020 पासून BS6 मानक लागू होत आहेत. हीरो स्प्लेंडर आयस्मार्ट (Hero Splendor iSmart) कंपनीची पहिली BS6 मानकांनुसार असलेली बाइक आहे. हीरो मोटोकॉर्पशिवाय अजून दोन कंपन्या आपल्या वाहनांच्या किंमती वाढवण्याची शक्यता आहे. हीरो मोटोकॉर्पशिवाय मारुती सुझुकी, टाटा मोटर्स आणि महिंद्रा & महिंद्रानेही आपल्या वाहनांच्या किंमती वाढवण्याची घोषणा केली आहे.

विक्री वाढणार –
किंमत वाढवल्याच्या घोषणेनंतर हिरोच्या वाहनांच्या विक्रीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. नव्या किंमती लागू होण्याआधीच वाहनांची मागणी वाढण्याची शक्यता आहे.