होंडा मोटारसायकल्स अॅंड स्कूटर इंडियाने भारतात नवी 2018 CD 110 Dream DX बाइक लॉन्च केली आहे. 48 हजार 641 रुपये इतकी होंडा CD 110 ड्रीम DX ची (दिल्ली एक्स-शो रूम) किंमत ठेवण्यात आली आहे. एक लिटर पेट्रोलमध्ये 74 किमी इतका या गाडीचा मायलेज असेल असा दावा कंपनीने केला आहे. टीव्हीएसच्या व्हिक्टरला या बाइकद्वारे टक्कर मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पाच रंगांमध्ये ही बाइक उपलब्ध असेल. 2018 एडिशन मॉडेलमध्ये होंडाने नवीन आणि आकर्षक गोल्ड ग्राफिक्स दिले आहेत. तसंच क्रोम मफलर प्रोटेक्टरही देण्यात आलं आहे. होंडाच्या या बाइकमध्ये सेल्फ स्टार्ट फीचरही देण्यात आलं आहे. बाईकमध्ये ट्यूबलेस टायरचा वापर करण्यात आला आहे.

8 लीटरची पेट्रोल टाकी असलेल्या या बाइकमध्ये  या बाइकमध्ये देण्यात आली आहे. तसंच बाइकमध्ये होंडा इको टेक्नॉलजीचं 110 सीसी, एअर कूल्ड, सिंगल सिलेंडर इंजिन असून हे इंजिन 8.31 बीएचपी पावर आणि 9.09 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करतं. होंडाने सर्वप्रथम 2014 मध्ये भारतीय बाजारात कंपनीने ही बाइक आणली होती.