News Flash

होंडाच्या कारमध्ये ‘हा’ बिघाड असल्यास कंपनीकडून मिळणार मोफत सेवा

आतापर्यंत २२,८३४ कार घेतल्या परत

कंपनीसाठी आपला माल खपणे जास्त महत्त्वाचे असते. कारमध्ये आघाडीवर असलेली होंडा कंपनी या बाबतीत यशस्वी आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. पण ‘ग्राहकांना एकदा आपले उत्पादन विकले की आपला संबंध संपला’ असे मानणाऱ्या जमान्यात होंडाने आजही आपली विश्वासार्हता जपली आहे. याचे उदाहरण म्हणजे आपण तयार केलेल्या कारमध्ये त्रुटी असल्याचे लक्षात आल्यावर कंपनीने त्या कार ग्राहकांकडून पुन्हा मागवल्या आहेत.

आता होंडाच्या कारमध्ये असा काय बिघाड झाला की कंपनीला आपल्या कार ग्राहकांकडून पुन्हा मागवाव्या लागल्या. तर कारच्या एअरबॅगमधील बिघाडामुळे तब्बल २२,८३४ कार परत मागवल्या आहेत. यामध्ये ५१० होंडा अकॉर्ड कार, २४० जॅज कार आणि २२,०८४ होंडा सिटी कारचा समावेश आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, २०१३ मध्ये तयार करण्यात आलेल्या अकॉर्ड, जॅज आणि सिटी कारच्या एअरबॅग इंफ्लेक्टरमध्ये बिघाड होता. यामुळे आपतकालिन परिस्थितीत या एअरबॅग योग्य पद्धतीने काम करु शकत नसल्याचे कंपनीच्या लक्षात आले.

अशा परिस्थितीत चालक आणि गाडीतील इतर प्रवाशांच्या जीवाला धोका पोहचण्याची शक्यता असल्याने कंपनीने तब्बल २२,८३४ कार परत मागवल्या आहेत. विशेष म्हणजे अजूनही तुम्ही तुमच्या कारमध्ये ही समस्या आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या गाडीचा आयडेंटी नंबर (व्हीआयएन) कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर टाकावा लागेल. जर तुमच्या कारमध्ये संबंधित बिघाड असेल तर तो मोफत दुरुस्त करुन दिला जाणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2018 7:27 pm

Web Title: honda recalled their 22834 cars due to faulty airbag
Next Stories
1 वजन कमी करण्यासाठी ‘ही’ फळे खा
2 चक्क गुगल सांगू शकत नाही, जीझस म्हणजे काय…
3 केस दाट होण्यासाठी ‘हे’ उपाय करा
Just Now!
X