आजकाल आपल्याला डिप्रेशनबद्दल खूप ऐकायला, वाचायला मिळते. आजुबाजूला पाहीले तर सतत तक्रार करणारे, आयुष्याबद्दल दुःखी किंवा असंतुष्ट असणारे, सतत कंटाळलेले किंवा थकलेले अनेकजण दिसतात. आपल्याला स्वत:ला देखील कधीकधी असे काहीसे होते. पण यामागे नेमके काय कारण आहे ते निटसे कळत नाही. मग धकाधकीचे जीवन, ऑफिसमधील दगदग, ट्रॅफीक अशा कोणत्यातरी गोष्टीमध्ये आपण ते कारण शोधत बसतो. पण खरं सांगायचं तर आपल्या शरीरातील काही ठराविक हार्मोन्स आपले आनंदी असणे नियंत्रित करतात. या हार्मोन्सची नावे एन्डॉर्फिन, डोपामाईन, सिरोटोनिन आणि ऑक्सिटोसिन अशी आहेत. काही सोप्या गोष्टी करून आपण या हार्मोन्सचा योग्य पुरवठा केला जातो.

एन्डॉर्फिन :

forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
AI Artist Imagines Summer In Parallel Universe viral photo
‘हाय गर्मी!’ बर्फाची टोपी, अंगावर एसी; भविष्यात असा असेल का उन्हाळा? ‘या’ AI फोटोची होत आहे तुफान चर्चा
what is the right way to wash and store grapes
द्राक्षांवरील जंतू कसे घालवायचे? ‘व्हिनेगर अन् सोडा’ खरंच ठरतो उपयोगी? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत…
how to control blood sugar on the occasion of holi
Blood Sugar : होळीला गोड खाताना रक्तातील साखर कशी नियंत्रणात ठेवावी? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात…

१. व्यायाम केल्याने शरीरात उत्तम प्रमाणात एन्डॉर्फिन निर्माण होते. एन्डॉर्फिनचा शरीरावरील प्रभाव २-३ तास मोठ्या प्रमाणावर आणि कमी प्रमाणात २४ तासापर्यंत राहतो. त्यामुळे नियमित व्यायामाला प्राधान्य द्या.

२. कोका आणि तिखट पदार्थ जसे मिरची, हिरवी, लाल किंवा पिवळी भोपळी मिरची हार्मोन्स निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरतात.

३. भरपूर मनमोकळेपणाने हसणे हे देखील एन्डॉर्फिन निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरते.

डोपामाइन :

१. कोणतेही ध्येय गाठणे, लहान मोठे काम पूर्ण करणे यामुळे आपल्या शरीरात डोपामाइन तयार होते. त्यामुळे रोजचा दिनक्रम नीट पूर्ण करा. अन्यथा मनावर एकप्रकारचे ओझे राहून हा हार्मोन स्त्रवत नाही. लहान मोठे ध्येय गाठल्यावर स्वत:चे अभिनंदन करा.

२. याबरोबरच खाण्यापिण्यात काही बदल करुन आपण डोपामाइनचा स्तर वाढवू शकतो. जसे साखर, अल्कोहोल, कॉफी, ड्रग्स टाळा.

३. आहारात पुरेसे मॅग्नेशियम घ्या. पालेभाज्या, फळे, बदाम, आक्रोड, मोड आलेली कडधान्ये, अंडी, मासे या सर्व पदार्थात भरपूर मॅग्नेशियम असते.

४. क आणि इ जिवनसत्व भरपूर प्रमाणात घ्या.

५. नियमीत व्यायाम आणि पुरेशी झोप घ्या.

सिरोटोनिन :

१. भरपूर सुर्यप्रकाश मिळाल्याने उत्तम सिरोटोनिन निर्माण होते.

२. नियमित व्यायामामुळे देखिल सिरोटोनिन स्त्रवण्यास मदत होते.

३. आहारात ‘ब’ जिवनसत्व, प्रथिने, पचनसंस्थेसाठी उत्तम असणारी धान्य, कर्बोदक यांचा भरपूर समावेश करावा.

४. इतरांना मदत करणे, समाजासाठी किंवा आसपासच्या लोकांसाठी काही कार्य करणे यामुळेही सिरोटोनिन निर्माण होण्यास मदत होते.

ऑक्सिटोसिन :

१. आपल्या जवळच्या व्यक्तीला स्पर्श करणे, मिठी मारणे किंवा आपल्या पार्टनर बरोबर शारिरीक संबंध यामुळे सर्वात जास्त ऑक्सिटोसिन निर्माण होते.

२. भरपूर हसणे देखील ऑक्सिटोसिन निर्माण करते.

३. तसेच आपण स्वत:चे किंवा इतरांनी आपले कौतुक करणे, तसेच आपण इतरांचे कौतुक करणे त्यांना प्रोत्साहीत करणे, इतरांना वेळ देणे, त्यांना गरज असेल तेव्हा मित्र म्हणून त्यांच्या व्यथा विवंचना ऐकून घेणे, यामुळे ऑक्सिटोसिन निर्माण होण्यास मदत होते.

या गोष्टी करायलाच हव्यात

१. नियमीत व्यायाम करा.

२. लहान मोठी ध्येय गाठा.

३. इतरांना मदत करा, सर्वांशी चांगले वागा.

४. ध्यान करणे महत्त्वाचे आहे.

५. आपल्या माणसांना भेटून हस्तांदोलन करा, मिठी मारा.

६. भरपूर जिवनसत्व, प्रथिने असणारा चौरस, सकस आहार घ्या. आनंदी राहा.

डॉ.अस्मिता सावे

आहारतज्ञ