News Flash

हसत खेळत कसरत : ‘शोल्डर श्रग्ज’

दोन्ही हातात पाण्याच्या बाटल्या घ्या. हात समोर काटकोनात करून खांदे वर उचला.

प्रतिनिधिक छायाचित्र

खांद्यावरील स्नायू बळकट करण्यासाठी हा व्यायाम केला जातो. हा एक ‘वॉर्म अप’चा प्रकार असून या व्यायामाने ट्रॅपेझिअस मसल्स (मानेच्या पाठीमागील बाजूस खांद्यांमधील स्नायू) मजबूत होतात. उभे राहून किंवा खुर्चीत बसून आणि वजन उचलून वा वजन न उचलता हा व्यायाम करता येतो. जर खांदादुखी आणि मानदुखीची समस्या नसेल तर हा व्यायाम करताना वजनाचा वापर करा.

दोन्ही हातात पाण्याच्या बाटल्या घ्या. हात समोर काटकोनात करून खांदे वर उचला. दोन ते तीन सेकंद खांदे वर उचलून धरा. त्यानंतर हळूहळू खांदे खाली करा.

(छायाचित्र १ आणि २ पाहा)

दोन्ही हातात पाण्याच्या बाटल्या घ्या. हात शरीरापासून काही अंतरावर घ्या. हात सरळ न घेता किंचितसे वाकवा. त्यानंतर खांदे वर उचलून खाली घ्या. असे सतत १२ वेळा करा. पहिल्या प्रकारापेक्षा या प्रकाराने खांद्यांचे स्नायून अधिक मजबूत होतात. (छायाचित्र ३ आणि ४ पाहा)

– डॉ. अभिजीत जोशी – dr.abhijit@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2018 5:21 am

Web Title: how to do shoulder shrugs properly
Next Stories
1 नैराश्याने कर्करुग्ण दगावण्याचे प्रमाण अधिक
2 ७३ टक्के संपत्ती देशातील १ टक्के श्रीमंतांकडे
3 व्यावसायिकांसाठी व्हॉटसअॅपचे नवीन अॅप लाँच
Just Now!
X