News Flash

चवदार : कसे बनवायचे फ्लॉवरचे लोणचे, सॅलड रोल, कोलंबीची खिचडी?

फ्लॉवरचे लोणचे रुचकर लागते

सॅलड रोल

साधे पराठे दोन
उकडलेले अंडे एक
सोलून बारीक तुकडे करा
मेयोनीज दोन चमचे
टोमॅटो अर्धा. बिया काढून बारीक चिरा
काकडी अर्धा बारीक चिरा
गाजर अर्धे किसून
लेटय़ुस पाने दोन
चीज क्यूब तीन किसून
बटर एक चमचा
मीठ चवीप्रमाणे
काळी मिरी पावडर अर्धा चमचा
दही अर्धी वाटी
कांदा अर्धा बारीक चिरून
कोिथबीर दोन चमचे बारीक चिरून
सैंधव मीठ आवडीप्रमाणे
जाडसर शेंगदाणा कूट एक चमचा
तिखट अर्धा चमचे (आवडीप्रमाणे)
वरील डीपचे सर्व साहित्य एकत्र करून थंड करावे.
उकडलेले अंडे, मेयोनीज, टोमॅटो, काकडी, गाजर, मीठ, चीज सर्व एकत्र करावे.
पराठय़ाला बटर लावून त्यावर लेटय़ुसचे पान ठेवा. त्यावर वरील केलेले मिश्रण पसरा आणि पराठय़ाचा घट्ट रोल बनवा. हा रोल प्लास्टिक पेपरमध्ये घट्ट गुंडाळा.
दहा-पंधरा मिनिटे फ्रिजमध्ये ठेवा. यामुळे त्याचा शेप फिक्स होईल आणि सव्‍‌र्ह करताना कापल्यावर आकार बिघडणार नाही. वरून किसलेले चीज घालून डीपबरोबर सव्‍‌र्ह करा.
(टीप :– सॅलड रोल थंडच सव्‍‌र्ह करतात. ही एक स्वयंपूर्ण, पौष्टिक आणि पोटभरीची पाककृती आहे.)

फ्लॉवरचे लोणचे
फ्लॉवर अर्धा किलो (स्वच्छ धुऊन रुमालावर कोरडा करून नंतर बारीक चिरावा)
मीठ एक टेबलस्पून
(कढईत भाजून कोरडे करावे)
मेथी दाणे पाव चमचा
(तेलात तळून बारीक करावे)
मोहरी पावडर तीन चमचे
खडा िहग एक चमचा
(तेलात तळून पावडर करा)
तिखट पाव वाटी किंवा आवडीप्रमाणे कमी-जास्त
मोहरी अर्धा चमचा

सहा ते आठ लिंबांचा रस
तेल अर्धा वाटी
प्रथम तेल गरम करा. त्यात अर्धा चमचा मोहरी टाका. मोहरी तडतडल्यावर गॅस बंद करा. तेल थंड करा. एका पातेल्यात मोहरी पावडर, मीठ, तिखट, हिंग पावडर, मेथी पावडर एकत्र करा. त्यावर लिंबाचा रस घाला. त्यात बारीक चिरलेला फ्लॉवर घालून नीट एकत्र करा. काचेच्या बाटलीत भरून त्यात थंड झालेले तेल घाला आणि नीट एकत्र करा. हे लोणचे अतिशय रुचकर लागते. मुरावे लागत नाही. केल्यावर लगेच खाता येते.
टीप :- फ्लॉवर जोपर्यंत करकरीत आहे तोपर्यंत संपवा. फ्लॉवर मऊ पडल्यास लोणच्याची मजा जाते.

कोलंबीची खिचडी
तांदूळ एक ते दीड वाटी
कोलंबी एक वाटी (स्वच्छ धुतलेली / धागा काढलेली)
आलं-लसूण-मिरची वाटण तीन चमचे
नारळाचे एक वाटी घट्ट दूध
गरम मसाला अर्धा चमचा
कांदे दोन बारीक चिरलेले
तमालपत्र एक

हिंग पावडर अर्धा चमचा
तेल अर्धी वाटी
तिखट एक चमचा
हळद अर्धा चमचा
मीठ चवीप्रमाणे
मटार पाव वाटी
तळलेला मसाला : एक टेबलस्पून (एक कांदा, अर्धी वाटी सुकं खोबरं, दोन लवंगा, एक इंच दालचिनी तुकडा, एक चमचा धणे आणि तीन-चार लसूण पाकळ्या हे सर्व तेलात भाजून बारीक वाटावे)
कोळंबीला हळद, मीठ आणि दोन चमचे आलं-लसूण-मिरची वाटण लावून ठेवा. तांदूळ धुवा व त्याला हळद, तिखट, मीठ, एक चमचा आलं-लसूण-मिरची वाटण, गरम मसाला, तळलेला मसाला लावून ठेवा.
पातेल्यात तेल गरम करा. त्यात हिंग व तमालपत्र टाका. लगेच कांदा टाकून परता. कांदा गुलाबी झाल्यावर त्यावर कोळंबी टाका आणि तेल सुटेपर्यंत परता. लगेच त्यावर मटार घालून परता. नंतर तांदूळ घालून नीट परता, त्यावर गरम पाणी टाका व चांगली उकळी आल्यावर नारळाचे घट्ट दूध घाला आणि नीट मिसळू द्या.
त्यावर झाकण ठेवून खिचडी नीट शिजू द्या.
खिचडी गरमागरम सव्‍‌र्ह करा.

बांगडय़ांचे लिपते
ताजे बांगडे चार-पाच स्वच्छ धुऊन त्याचे दोन तुकडे करा व चिरा पाडून घ्या
आलं-लसूण वाटण दोन चमचे
कढीपत्ता पाच-सहा पाने
मोहरी पाव चमचा
हळद पाव चमचा
काश्मिरी मिरची पाच-सहा
लाल तिखट अर्धा चमचा
जिरे एक चमचा
आलं एक इंच
लसूण चार-पाच पाकळ्या
दालचिनी एक इंच
मीठ चवीप्रमाणे
साखर अर्धा चमचा
व्हिनेगर दोन टेबलस्पून
एक कांदा परतून घ्या
तेल एक वाटी
वरील सर्व वाटणाचे जिन्नस एकत्र करून दोन टेबलस्पून व्हिनेगर घालून कच्चे वाटा.
(तिखटाचे प्रमाण आवडीप्रमाणे कमी-जास्त करावे.)
स्वच्छ केलेल्या बांगडय़ाला मीठ, हळद आणि आले-लसूणाचे वाटण लावून साधारण अर्धा तास ठेवा आणि नंतर श्ॉलोफ्राय करा.
पॅनमध्ये पाव वाटी तेल गरम करा. त्यात पाव चमचा मोहरी आणि पाच-सहा कढीपत्त्याची पाने टाका आणि त्यामध्ये वरील वाटण घालून तेल सुटेपर्यंत परता. या मसाल्यात अर्धी वाटी पाणी घाला व उकळी आणा (ग्रेव्ही घट्ट वाटल्यास आणि थोडे गरम पाणी घाला). वरून बारीक चिरलेली कोिथबीर घाला.
सर्व्हिंग : एका प्लेटमध्ये तळलेले बांगडे ठेवून त्यावर ग्रेव्ही घालून बारीक चिरलेली कोिथबीर घालून चपाती किंवा भाताबरोबर सव्‍‌र्ह करा.

(सौजन्य : लोकप्रभा)

response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2017 9:36 am

Web Title: how to make salad roll cauliflower pickel
Next Stories
1 ‘राष्ट्रीय आरोग्य धोरण’ रखडले!
2 स्पिन्स्टर्स पार्टीचं फनफुल ड्रेसिंग
3 शीतपेय, पिझ्झामुळे लहान मुलांना यकृताचे आजार
Just Now!
X