हल्ली अनेकजण जेवण तयार करण्यासाठी सर्रास नॉन-स्टिक भांड्याच्या वापर करतात. या भांड्यामध्ये जेवण तयार करताना तेलही कमी लागते आणि एखादा पदार्थ भांड्यांच्या तळाला चिकटतही नाही म्हणून गृहिणींची पसंती नॉन-स्टिक भांड्यांना असते. पण, नॉन स्टीक भांड्याचा जास्त प्रमाणात वापर करणंही आरोग्यास धोकादायक ठरू शकतं. काही नॉन- स्टिक भांडी ही दुय्यम दर्जाच्या कोटींगपासून बनवली असतात त्यामुळे अन्न शिजवताना या कोटींगमधले विषारी घटक शरीरात जाऊन शरीराला धोका निर्माण होण्याची शक्यता असते.

नॉन-स्टिक भांडी तयार करताना ‘परफ्लोरो ओक्टॅनॉइक ॲसिड केमिकल’चा वापर केला जातो, हे आरोग्यासाठी घातक असे केमिकल आहे. वास्तवात नॉन-स्टिक भांड्यामधील ही केमिकल्स स्थिर अवस्थेमध्ये शरीराला घातक नाहीत. मात्र जेव्हा तुम्ही या नॉन-स्टिक भांड्यांना अन्न शिजवण्यासाठी अति-उष्णता देता आणि जेव्हा त्या भांड्याचे तापमान साधारण २६० अंश सेल्सिअस एवढ्या उष्णतेपर्यंत पोहोचते तेव्हा त्यामधील केमिकल्सचे विघटन सुरू होते आणि ते भांडे विषारी वायू फेकू लागते. म्हणून नॉन- स्टिक भांड्यांमध्ये अन्न शिजवता काळजी घेतली पाहिजे.

balmaifal article, story for kids, water literacy, Water importance, do not waste water lesson, story cum lesson for water, save water, kids and water, marathi article, loksatta article,
बालमैफल : जलसाक्षरता
moong dal scrub for glowing skin
Skin Care Tips: मुग डाळीचा असा वापर कराल तर खऱ्या वयापेक्षा दिसाल लहान व तरुण; सुरकुत्या, पिंपल्सही होतील दूर!
goa mango farmers deploy jamun to fight
फक्त १० रुपयांच्या जांभळांनी वाचवा आंब्याची बाग? शेतकऱ्याने सांगितला माकडांच्या हल्ल्यापासून वाचण्याचा हटके जुगाड!
How To Make Gudi Padwa Sakhrechya Gathi At Home gudi padwa 2024
गुढी पाडव्यासाठी साखरेच्या गाठी यंदा बनवा घरीच, साखरेच्या बत्तास्यांची सोपी झटपट कृती

नॉन -स्टिक भांड्यात अन्न शिजवण्यापूर्वी घ्यायची काळजी
– ही भांडी वापरताना साबणाच्या कोमट पाण्याने धुऊन आणि कोरडे करून मग वापरावी.
– नॉन- स्टिकची भांडी गरम असताना साफ करू नयेत. कारण या भांड्यावर थंड पाणी पडल्यास त्याच्यावरचं कोटिंग निघून जाण्याची शक्यता असते.
– नॉन-स्टिक भांडी कधीही खसखसून घासू नयेत. त्याचे कोटिंग निघून जाते.
– नॉन-स्टिक भांड्यात अन्न शिजवताना लाकडाच्या चमच्याचा वापर करावा.
– नॉन- स्टिक भांडी धुण्यासाठी स्पंज, नायलॉन स्क्रबर, लिक्विड सोप आणि कोमट पाणी याचा वापर करावा. भांडी साफ करण्यासाठी सोडायुक्त साबण, ब्लीच, तारेचा स्क्रबर यांचा वापर कधीही करू नका.