Hyundai Venue ही नवीन एसयूव्ही प्रकारातील कार भारतात 21 मे रोजी लाँच करण्यात आली असून या कारला ग्राहकांचा शानदार प्रतिसाद मिळताना दिसतोय. अवघ्या एका महिन्यात Venue साठी 33 हजारांहून अधिक बुकिंग आली असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली. म्हणजेच दिवसाला जवळपास हजाराहून अधिक लोक या गाडीची बुकिंग करत असल्याचं चित्र आहे. याशिवाय 2 लाख लोकांनी या कारबाबत येऊन विचारणा केली आणि माहिती घेतली असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. सब-कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमधील ही कार देशातील पहिली मेड-इन-इंडिया कनेक्टेड कार असल्याचं कंपनीने म्हटलं आहे. पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही व्हेरिअंट्समध्ये ही कार बाजारात दाखल झाली आहे. 6.50 लाख रुपये इतकी या एसयूव्हीच्या बेसिक व्हेरिअंटची एक्स-शोरुम किंमत आहे.

33 नव्या फीचर्ससह पहिली मेड-इन इंडिया कनेक्टेड कार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. 33 पैकी 10 फीचर केवळ भारतासाठी विकसित करण्यात आले आहेत. यातील काही आधुनिक फीचर्स केवळ BMW7 सारख्या कारमध्ये पहायला मिळतात. Hyundai Venue मधील 33 कनेक्टेड फीचर एखाद्या अॅप किंवा ह्युमन मशीन इंटरफेसद्वारे जोडले जातील. या कारमध्ये कंपनीने ‘ब्ल्यूलिंक’ कनेक्टिव्हिटी तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.
फोर्ड इकोस्पोर्ट, महिंद्रा XUV300 ,टाटा नेक्सॉन आणि सब-कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमधील ‘बॉस’ म्हणून ओळख असलेल्या मारुती सुझुकीच्या व्हिटारा ब्रेझा या गाड्यांशी Venue ची थेट टक्कर असणार आहे. कारच्या जवळपास प्रत्येक प्रकारात मारुतीशी स्पर्धा करणाऱ्या Hyundai कंपनीकडे सब-कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमध्ये मारुतीला टक्कर देण्यासाठी आतापर्यंत कार नव्हती. पण आता ही कमतरता Venue पूर्ण करणार आहे. या SUV मध्ये नवीन 1.0-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन, 1.2-लिटर नॅचरली अॅस्पायरेटेड पेट्रोल इंजिन आणि 1.4-लिटर डिझेल इंजिन मिळेल. थ्री-सिलिंडर टर्बोचार्ज्ड इंजिनासह 7-स्पीड ड्युअल-क्लच ट्रांसमिशन मिळेल, तर 1.2-लिटर पेट्रोल आणि 1.4-लिटर डिझेल इंजिनमध्ये अनुक्रमे 5 आणि 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आहे. विशेषतः भारतासाठी विकसित करण्यात आलेल्या फीचर्समध्ये ड्रायव्हिंग इंफॉर्मेशन/ बिहेवियर, डेस्टिनेशन शेअरिंग, रिअल टाइम व्हेइकल ट्रॅकिंग, व्हेइकल लोकेशन शेअरिंग, जिओ-फेंस अलर्ट, स्पीड अलर्ट, टाइम फेंसिंग अलर्ट, वॉलेट अलर्ट, आयडल अलर्ट आणि व्हॉइस रिकग्निशन या फीचर्सचा समावेश आहे.

 किंमत –