20 October 2020

News Flash

आयडीयाचा १०९ रुपयांचा आकर्षक प्लॅन जाहीर

स्पर्धक कंपन्यांना देणार टक्कर

रिलायन्स जिओ बाजारात आल्यानंतर स्पर्धक कंपन्यांनी नवनवे प्लॅन्स जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. आयडीया सेल्युलरने ग्राहकांसाठी नुकताच एक नवीन प्लॅन बाजारात आणला आहे. हा प्लॅन १०९ रुपयांचा असून यामध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १ जीबी डेटा या देण्यात येणार आहे. यासोबत १०० एसएमएसही मोफत मिळणार आहेत. या प्लॅनची व्हॅलिडीटी १४ दिवसांची आहे. सध्या ही ऑफर ठराविक सर्कलमध्ये असेल असेही सांगण्यात आले आहे. याठिकाणच्या ग्राहकांना या विशेष प्लॅनचा फायदा घेता येणार आहे.

यामध्ये अनलिमिटेड कॉलसाठी रोज २५० मिनिटे मिळतील असे सांगण्यात आले आहे. याबरोबरच आठवड्याभरात एक हजार मिनिटांचे कॉलिंग मोफत असेल. याआधी कंपनीने ९३ रुपयांचा प्लॅन बाजारात आणला होता. त्या प्लॅनची व्हॅलिडिटी केवळ १० दिवसांची होती. त्याचवेळी एअरटेलनेही ९३ रुपयांमध्ये २८ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह एक प्लॅन आणला होता. एअरटेलने ९३ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये यूजर्सना एक जीबी डेटा मोफत दिला आहे. एअरटेलने या प्लॅनमध्ये एक दिवसाला २५० मिनिटांहून अधिक कॉलिंगची ऑफर दिली आहे. आता आयडीयाच्या १०९ रुपयांचा प्लॅनने या स्पर्धेत आणखी भर पडणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2018 7:41 pm

Web Title: idea launched new plan of rs 109
Next Stories
1 ‘या’ गोष्टींमुळे तुम्ही ठरु शकता इतरांपेक्षा वेगळे
2 घाबरू नका, आपला मोबाइल नंबर 10 अंकीच राहणार
3 भारतात फिरण्यासाठीची ५ ‘ऑफ बीट’ ठिकाणं
Just Now!
X