शरीरातील प्रत्येक अवयवाचे आपले असे एक स्थान आणि वैशिष्ट्य आहे. यकृत हाही असाच शरीरातील अतिशय महत्त्वाचा भाग आहे. या अवयवाचे काम चांगल्या पद्धतीने चालण्यासाठी त्याची सुरुवातीपासूनच विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. यामध्ये काही बिघाड झाला तर अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे यकृत चांगले ठेवण्यासाठी आहारात काही गोष्टींचा समावेश केल्यास त्याचा निश्चितच फायदा होऊ शकतो. पाहूया कोणत्या घरगुती उपायांमुळे यकृत तंदुरुस्त राहण्यास मदत होते.

आवळा – आवळा हा शरीरातील अनेक समस्यांसाठी उपयुक्त असतो. तसेच तो यकृतासाठीही उपयोगाचा आहे. रात्री कोरड्या आवळ्याचे ६ ते ७ तुकडे पाण्यात भिजवून ठेवावेत. हे पाणी सकाळी उठल्यावर प्यावे. असे पूर्ण एक आठवडा केल्यास तुमचे यकृताशी संबंधित सगळे आजार पूर्णपणे बंद होतील.

how to make fish egg omelette Fish egg recipe in marathi
झटपट नाश्त्यासाठी बनवा “माशाच्या अंड्याचे ऑमलेट” लहान मुलंही खातील आवडीने
Do not come to ask for votes placards from onion growers in Malwadi
मत मागण्यासाठी येऊ नये, माळवाडीत कांदा उत्पादकांकडून फलक
How To Make Gudi Padwa Sakhrechya Gathi At Home gudi padwa 2024
गुढी पाडव्यासाठी साखरेच्या गाठी यंदा बनवा घरीच, साखरेच्या बत्तास्यांची सोपी झटपट कृती
homemade mango ice cream recipe
Mango Ice-cream: मुलांसाठी घरच्या घरी बनवा आंब्याचे थंडगार आइस्क्रीम! वापरा फक्त ‘हे’ तीन पदार्थ

बडीशेप – बडीशेप थंड असल्याने ती आरोग्यासाठी चांगली असते. यकृतासाठीही ती अतिशय उपयुक्त असते. बडीशेप दह्यामध्ये भिजवून जेवणाच्या आधी खावी. असे ४ ते ५ दिवस केल्याने यकृत साफ होण्यास मदत होईल. यामुळे आपल्या शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होईल.

लसूण – यकृताच्या सुयोग्य कार्यासाठी आहारात लसणाचा समावेश असणे उपयुक्त असते. यकृतातील एन्जाइमला सक्रिय करण्याचे काम लसूण करतो. ज्यामुळे शरीरातील टॉक्सिन बाहेर फेकले जातात. लसणात एलिसिन आणि सेलेनियम हे घटक असतात या घटकांमुळे यकृताचे विविध प्रकारच्या टॉक्सिनच्या हल्ल्यांपासून बचाव होतो. याशिवाय लसणामुळे कोलेस्टेरॉल कमी राहण्यासही मदत होते. मात्र लसणाची तयार पेस्ट किंवा पावडरपेक्षा ताजा लसूण आरोग्यासाठी केव्हाही चांगला. त्यामुळे रोज किमान २ ते ३ लसणांचा आहारात समावेश असणे गरजेचे आहे.

मोसंबी- मोसंबीत जीवनसत्व क असते. याशिवाय यामध्ये यकृत साफ होण्यास मदत होईल असेही घटक असतात. त्यामुळे दररोज आपल्या आहारात एक ग्लास मोसंबी ज्यूस किंवा १ मोसंब्याचा समावेश असावा.

बीट – यकृताचे कार्य चांगले होण्यासाठी बीट अतिशय उपयुक्त असते. रक्त शुद्ध होण्यासाठी बीटाचा उपयोग होतो. त्यामुळे आहारात बीट असणे गरजेचे आहे. बीटाचा ज्यूस किंवा कोशिंबिर करुन त्याचा आहारात समावेश करु शकता.

लिंबू – एन्जाइमला सक्रीय करण्यासाठी लिंबाचा उपयोग होतो. यामध्ये जीवनसत्व क असल्याने एन्जाइम वाढण्यासाठी त्याचा फायदा होतो. यामुळे पचनशक्तीही सुधारत असल्याने दिवसातून एक ग्लास लिंबू सरबत प्यावे.

ग्रीन टी – ग्रीन टीच्या सेवनामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकली जातात आणि लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते. दिवसातून ठराविक वेळेला ग्रीन टी प्यावा त्यामुळे यकृताचे कार्य सुधारते. हा चहा गोड हवा असेल तर यामध्ये साखरेपेक्षा मध घालावा.

हळद – हळदीमुळे यकृत तर साफ होतेच पण चरबी कमी करण्यासही त्याची मदत होते. विविध पदार्थांना फोडणी देताना तर आपण हळदीचा उपयोग करतोच पण गरम पाण्यातही थोडी हळद टाकून ते पाणी प्यायल्यास त्याचा फायदा होतो.

सफरचंद – सफरचंदामुळेही यकृत चांगले राहण्यास मदत होते. यामध्ये असणाऱ्या फायबरमुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडण्यास मदत होते. दररोज एक सफरचंद खावे किंवा त्याचा ज्यूस प्यावा.