News Flash

किंमत 10 हजार 499 रुपये ; 4GB रॅमसह 48MP क्वॉड कॅमेरा सेटअप + 5000mAh बॅटरी, ‘बजेट’ स्मार्टफोनचा ‘सेल’

होल-पंच डिस्प्ले डिझाइनसोबत रिअर फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक सेन्सरही

‘इन्फिनिक्स’ या ‘बजेट’ स्मार्टफोन बनवणाऱ्या कंपनीचा Infinix Hot 9 Pro हा स्मार्टफोन खरेदी करण्याची आज (दि.2) संधी आहे. कंपनीने या फोनच्या विक्रीसाठी खास सेलचं आयोजन केलं आहे. दुपारी 12 वाजेपासून ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टच्या वेबसाइटवर Infinix Hot 9 Pro  साठी सेलला सुरूवात झाली आहे. 48 मेगापिक्सलच्या मुख्य कॅमेऱ्यासह क्वॉड-रिअर कॅमेरा सेटअप आणि 5,000 एमएएच क्षमतेची दमदार बॅटरी असलेल्या या फोनमध्ये अनेक शानदार फीचर्स आहेत. सेलमध्ये फोनच्या खरेदीवर काही शानदार ऑफरही आहेत. ऑफरनुसार, सेलमध्ये ‘अ‍ॅक्सिस बँक बझ क्रेडिट कार्ड’द्वारे हा फोन खरेदी केल्यास 10 टक्के डिस्काउंट मिळेल. तर, ‘फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड’द्वारे हा फोन खरेदी केल्यास 5 टक्के कॅशबॅकची ऑफर आहे. याशिवाय दरमहा 1,167 रुपये  नो कॉस्ट ईएमआय आणि स्टँडर्ड ईएमआयचा पर्यायही ग्राहकांसाठी आहे.

किंमत :-
Infinix Hot 9 Pro मध्ये क्वॉड कॅमेरा सेटअप आणि होल-पंच डिस्प्ले डिझाइन आहे. यातील 48 मेगापिक्सलचा मुख्य रिअर कॅमेरा असून अन्य तीन कॅमेरे अनुक्रमे 2MP मॅक्रो कॅमरा,  2MP डेप्थ कॅमेरा सेन्सर आणि एक लो लाइट सेन्सर आहे. तर, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8MP क्षमतेचा कॅमेरा दिलाय. अशाप्रकारे एकूण पाच कमेरे या फोनमध्ये आहेत.  10 हजार 499 रुपये इतकी या फोनची फ्लिपकार्टवर किंमत ठेवण्यात आली आहे.

आणखी वाचा- ‘या’ कंपनीने भारतात केलं पुनरागमन, लाँच केला ₹6000 पेक्षा कमी किंमतीत जबरदस्त स्मार्टफोन

Infinix Hot 9 Pro फीचर्स :-
इन्फिनिक्स हॉट 9 प्रोमध्ये ड्युअल-सिम कार्डचा सपोर्ट असून हा फोन अँड्रॉइड 10 वर आधारित XOS 6.0 वर कार्यरत असतो. हा फोन दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे. फोनमध्ये 6.6-इंचाचा एचडी+ (720×1600 पिक्सल) होल-पंच एलसीडी आयपीएस डिस्प्ले आहे. 2.0 गीगाहर्ट्ज़ हीलियो पी22 ऑक्टा-कोर प्रोसेसरसोबत 4 जीबी रॅम आहे. इंटर्नल स्टोरेज 64 जीबी असून माइक्रोएसडी कार्डद्वारे 256 जीबीपर्यंत वाढवता येणं शक्य आहे. याशिवाय फोनमध्ये 5,000 एमएएच क्षमतेची दमदार बॅटरीही आहे. ही बॅटरी 30 तासांपर्यंत 4जी टॉकटाइम, 130 तासांचा म्युझिक प्लेबॅक, 13 तासांचा गेमिंग आणि 19 दिवसांचा स्टँडबाय टाइम देते, असा कंपनीचा दावा आहे. तसेच या फोनमध्ये रिअर फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक सेन्सरही आहे. तर, कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये ब्लूटूथ 5, 3.5एमएम ऑडिओ जॅक, एफएम रेडिओ, युएसबी ओटीजी, व्हॉइस वाय-फाय आणि माइक्रो युएसबी पोर्ट आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 2, 2020 10:17 am

Web Title: infinix hot 9 pro to go on sale in india via flipkart check price specifications and offers sas 89
Next Stories
1 लवकरच फक्त अर्ध्या तासात सामान पोहोचवणार Amazon, कंपनीला मिळाला ‘ग्रीन सिग्नल’
2 काय सांगता…ऑफिसमध्ये फक्त झोपा काढण्यासाठी ‘ही’ भारतीय कंपनी देणार एक लाख रुपये पगार!
3 डोळे आलेत? मग घ्या ‘ही’ काळजी
Just Now!
X