News Flash

किंमत 10 हजारांपेक्षाही कमी, सर्वात स्वस्त ‘पॉप अप सेल्फी’ कॅमेऱ्याच्या स्मार्टफोनचा सेल

देशातील सर्वात स्वस्त पॉप-अप सेल्फी कॅमेरा स्मार्टफोन असल्याचा दावा...

Infinix S5 Pro हा स्मार्टफोन भारतात काही दिवसांपूर्वी लाँच करण्यात आला असून आज (दि.19) फ्लिपकार्टवर दुपारी 12 वाजेपासून या फोनच्या विक्रीसाठी खास सेलचं आयोजन करण्यात आलं आहे. Infinix S5 Pro ची सर्वात खास बाब म्हणजे यात पॉप अप सेल्फी कॅमेरा देण्यात आला असून सध्या हा भारतातील सर्वात स्वस्त पॉप-अप सेल्फी कॅमेरा स्मार्टफोन असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

भारतात Infinix चे S5 सीरिजमधील आता तीन स्मार्टफोन उपलब्ध झाले आहेत. या सीरीजमध्ये आधीपासून Infinix S5 आणि S5 Lite उपलब्ध आहेत. पॉप अप सेल्फी कॅमेरा असलेल्या नव्या फोनमध्ये कोणत्याही नॉचशिवाय फुल स्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे. फिंगरप्रिंट सेंसर फीचरही यात असून सिक्युरिटीसाठी फेस अनलॉक सपोर्ट आहे. Infinix S5 Pro मध्ये 6.53 इंच फुल एचडी + डिस्प्ले आहे. 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजसह 2.3 GHz क्वॉड-कोर MediaTek Helio P35 प्रोसेसर यामध्ये कंपनीने दिला आहे. या स्मार्टफोनमध्ये अ‍ॅण्ड्राइड 10 बेस्ड XOS 6.0 कस्टम स्किन देण्यात आली आहे. तसेच, DTS सराऊंड साऊंड असून कनेक्टिव्हिटीसाठी यात 4G LTE, Wi-Fi b/g/n ब्ल्यूटूथ 4.2 आणि जीपीएस सपोर्ट आहे. तर, फोटोग्राफीसाठी Infinix S5 Pro च्या रिअरमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. याचा प्रायमरी कॅमेरा 48MP चा आहे. तसेच यात 2 एमपी डेप्थ सेंसर आणि डुअल – LED फ्लॅशसह एक डेडिकेटेड लो लाइट सेंसर देण्यात आला आहे. याशिवाय, 4,000 mAh ची बॅटरी असलेल्या या फोनमध्ये सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेराही देण्यात आला आहे, हा कॅमेरा पॉप अप सेल्फी आहे.

आणखी वाचा- ट्रिपल कॅमेऱ्यासह ‘जंबो’ बॅटरी, ‘बजेट’ स्मार्टफोन Samsung Galaxy M21 झाला लाँच

किंमत :- भारतात Honor 9X आणि Tecno Camon 15 Pro सारख्या बजेट फोनमध्ये देखील पॉप अप सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. परंतु याची किंमत क्रमश: 13,999 रुपये आणि 14,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर, Infinix S5 Pro ची किंमत सिंगल 4 जीबी रॅम आणि 64 जीबी वॅरिएंटसाठी 9,999 रुपये निश्चित करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2020 11:30 am

Web Title: infinix s5 pro with pop up selfie camera at price rs 9999 sale starts on flipkart know specifications sas 89
Next Stories
1 14 वर्षांचा प्रवास संपला? Hero च्या लोकप्रिय Scooty चं प्रोडक्शन बंद
2 ट्रिपल कॅमेऱ्यासह ‘जंबो’ बॅटरी, ‘बजेट’ स्मार्टफोन Samsung Galaxy M21 झाला लाँच
3 सहा कॅमेऱ्यांच्या शानदार स्मार्टफोनसाठी ‘खास सेल’, मिळेल भरघोस डिस्काउंटही
Just Now!
X