Apple Event 2018 Venue, Time & Date : एखादा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी जेवढा गाजावाजा सुरू असतो तेवढाच गाजावाजा अॅपलच्या इव्हेंटबाबत असतो. अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये बुधवार १२ सप्टेंबर रोजी अॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कूक तीन नवे आयफोन लाँच करणार आहेत. 6.5 इंच, 5.8 इंच आणि 6.1 इंच या आकाराची स्क्रीन असणार्‍या या आयफोन्सचे फीचर्सही दमदार असतील. शिवाय 6.5 इंच आकाराची स्क्रीन असणार्‍या आयफोनची किंमत अेरिकेत एक हजार डॉलर म्हणजेच भारतात जवळपास 90 हजार रुपये असेल, असेही वृत्त आहे. या इव्हेंटमध्ये आयफोनशिवाय आणखी काही गॅजेटही लॉन्च केले जाणार असून त्यात अ‍ॅपल वॉच 4, अ‍ॅपल एअर पॉवर आणि पॉड 2 यांचा समावेश आहे.

आयफोन एक्सचे अपग्रेड व्हर्जन iPhone Xs, iPhone Xs Plus , iPhone Xc हे फोन लॉन्च करण्यात येणार आहेत. लॉन्चिंगपूर्वीच आयफोनच्या किंमती समोर आल्या आहेत. चीनची वेबसाईट Weibo ने याबाबत वृत्त दिले आहे. Weibo या वेबसाईटनुसार iPhone Xcची सुरूवातीची किंमत ६२१०० रुपये असणार आहे. तर iPhone Xsची किंमत ७७,९०० असणार आहे. तर iPhone Xs प्लसची किंमत ८८,४०० असणार आहे.

CNBCच्या एका रिपोर्टमध्ये Goldman Sachs या तज्ञांच्या माहितीप्रमाणे आयफोनच्या किंमती दिल्या आहे. १२ सप्टेबंर रोजी लॉन्च होणारा आयफोन iPhone 9 या नावाने ओळखला जाणार आहे. iPhone 9 ६१, ५०० पासून सुरूवात होऊ शकतो. याआधी याची किंमत ५०, ६०० असणार असे सांगण्यात येत होते. नव्या आयफोनमध्ये ड्युएल सिम असणार आहे. ड्युएल सिममुळे भारतात अॅपल वापरणाऱ्यांच्या संख्येत साधारण २ टक्क्यांनी वाढ होईल असे कंपनीचे मत आहे.