भारतात करोनाग्रस्तांचा आकड्यात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने लोकांची चिंता वाढलीये. त्यामुळे या व्हायरसची लागण होऊ नये यासाठी इंटरनेटद्वारे करोनाबाबत जास्तीत जास्त माहिती मिळवण्याचा अनेकांचा प्रयत्न आहे. पण दुसरीकडे, हॅकर्स ही एक संधी म्हणून पाहतायेत.

हॅकर्स आणि ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांच्या समूहाकडून करोना व्हायरसच्या नावाने फेक वेबसाइट बनवून ‘शिकार’ साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा धोका ओळखून दिल्ली पोलिसांच्या सायबरक्राइम डिव्हिजनने करोना व्हायरसच्या नावाने असलेल्या खोट्या वेबसाइट्सपासून दूर राहण्याचं आवाहन केलं आहे. दिल्ली पोलिसांनी ट्विटरद्वारे अशा धोकादायक वेबसाइट्सची यादी जारी केली असून या वेबसाइट्स ओपन न करण्याचा सल्ला दिला आहे.

या आहेत धोकादायक वेबसाइट –
-coronavirusstatus[.]space
-coronavirus-map[.]com
-blogcoronacl.canalcero[.]digital
-coronavirus[.]zone
-coronavirus-realtime[.]com
-coronavirus[.]app
-bgvfr.coronavirusaware[.]xyz
-coronavirusaware[.]xyz
-corona-virus[.]healthcare
-survivecoronavirus[.]org
-vaccine-coronavirus[.]com
-coronavirus[.]cc
-bestcoronavirusprotect[.]tk
-coronavirusupdate[.]tk

दिल्ली पोलिसांनी वरती नमूद केलेल्या १४ धोकादायक वेबसाइट्सची यादी जाहीर केली आहे. यापूर्वी सायबर सिक्युरिटी फर्म Recorded Future नेही अशाचप्रकारे एक लिस्ट जारी केली होती.