भारत सरकारने 59 चिनी अ‍ॅप्स बॅन केल्यानंतर जवळपास 10 दिवसांपूर्वी चीनवर दुसऱ्यांदा डिजिटल स्ट्राइक करताना अजून 47 अ‍ॅप्स बॅन केले होते. इकॉनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार, या 47 अ‍ॅप्समध्ये बाइटडान्सच्या व्हिडिओ एडिटिंग अ‍ॅप CapCut आणि शाओमी ब्राउजर अ‍ॅप्ससह जवळपास 15 नवीन अ‍ॅप्सचा समावेश आहे.

बॅन केलेल्या 47 अ‍ॅप्सच्या यादीत बहुतांश ‘क्लोनिंग’ अ‍ॅपचा समावेश आहे.  क्लोनिंग अ‍ॅप्स म्हणजे आधीपासून बॅन असलेल्या अ‍ॅपसाठी पर्याय म्हणून उतरवण्यात आले होते. या यादीत फोटो एडिटर AirBrush, शॉर्ट व्हिडिओ टूल Meipai, कॅमेरा अ‍ॅप BoXxCAM यांसारखे नवीन अ‍ॅप्स आहेत. हे अ‍ॅप्स चीनच्या मालकीच्या Meitu कंपनीचे आहेत.  भारत सरकारने Meitu अ‍ॅप जूनमध्ये बॅन केलं होतं. याशिवाय ई-मेल सर्व्हिस अ‍ॅप NetEase, QuVideo Inc चे गेमिंग अ‍ॅप Heroes War आणि SlidePlus यांसारख्या अ‍ॅप्सनाही बॅन करण्यात आलं आहे. Mi Community अ‍ॅपला ब्लॉक केल्यानंतर शाओमीच्या ‘मी ब्राउजर प्रो’लाही बॅन करण्यात आलं आहे. अशाचप्रकारे Baidu Search आणि Search Lite देखील बॅन झाले आहेत.

तर, Parallel Space या एकाच अ‍ॅपचे जवळपास 7 व्हर्जन हटवण्यात आले आहेत. Parallel Space द्वारे युजर्सना एकाच डिव्हाइसमध्ये फेसबुक किंवा व्हॉट्सअ‍ॅपचे दोन अकाउंट वापरता येतात. तसेच, लोकप्रिय चिनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Weibo लाही बॅन करण्यात आले आहे. 47  अ‍ॅप्समध्ये बहुतांश क्लोनिंग अ‍ॅप आहेत. यात Tiktok Lite, Helo Lite, SHAREit Lite, BIGO LIVE Lite, आणि VFY Lite यांचा समावेश आहे.