महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीने काही दिवसांपूर्वीच एमपीव्ही (मल्टी पर्पज व्हेइकल) प्रकरातील ‘माराझो’ गाडी लॉन्च केली आहे. लॉन्च झाल्यापासून या गाडीला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे कंपनीने दर महिन्याला मराझोच्या 4 हजार युनिट्सचं लक्ष्य ठेवल्याचं समजतंय.

माध्यमांतील वृत्तानुसार, ग्राहकांच्या चांगल्या प्रतिसादानंतर कंपनीने महिन्याला 4 हजार गाड्या विकण्याचं लक्ष ठेवलं आहे. सहा महिन्यांनंतर ग्राहकांचा कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहून माराझोचं दर महिन्याचं उत्पादन 7 हजारापर्यंत नेलं जाऊ शकतं. महिंद्राच्या या सात आसनी गाडीचे बेसिक मॉडेल 9 लाख 99 हजार तर टॉप एण्ड मॉडेल 13 लाख 90 हजारांना उपलब्ध असेल.

काय आहे खासियत –
या गाडीचे अनेक भन्नाट फिचर्स आहेत. गाडीचा आगळा वेगळा डॅशबोर्ड, इन्स्टुमेन्ट क्लस्टर, एसी व्हेन्ट्स आणि सीट आकर्षक आहेत. मात्र सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे छताला असलेले एसी व्हेन्ट्स. भारतात अशाप्रकारे मध्यभागी एसी व्हेन्ट्स असलेली ‘माराझो’ ही पाहिलीच गाडी ठरली आहे. डॅशबोर्ड हा सेंट्रलाइज कंन्सोल्स असणारा टी शेपमध्ये आहे. डॅशबोर्डवरच ७ इंचाची इन्फोर्मेशन टच स्क्रीन देण्यात आली असून त्यामध्ये अॅपल कारप्ले आणि अॅण्ड्रॉइड ऑटो असे दोन्ही पर्याय देण्यात आले आहेत. एक्सयुव्ही ५०० आणि केयुव्ही १०० नंतरही ही महेंद्राची सर्वात प्रिमियम कार असणार आहे. नावाला साजेसे डिझाइन करण्याच्या दृष्टीने या गाडीचे डिझायनिंग करताना त्यामध्ये शार्क ग्रील्स, शार्कच्या शेपटीच्या आकाराचे टेल लाइट्स, शार्क फीन अॅण्टीना असे भन्नाट लुक्स देण्यात आला आहे. या गाडीमध्ये १.६ लीटरचे डिझेल इंजिन आहे. या गाडीमध्ये सहा ऑटो गेअर किंवा सहा मॅन्यूअल गेअरबॉक्स आहेत.