ऑटोमोबाइल क्षेत्रातील दिग्गज कंपनी मारुती सुझुकी भारतातील सर्वाधिक लोकप्रिय कार कंपनी आहे. मात्र बऱ्याच काळानंतर यावर्षी मारुतीच्या कार विक्रीमध्ये घट झाली आहे. परिणामी विक्री वाढवण्यासाठी मारुती सुझुकी आपल्या अनेक कार्सवर सवलत देत आहे. जाणून घेऊया मारुतीच्या कोणत्या कारवर किती डिस्काउंट मिळतंय…

मारुती सुझुकी अल्टो 800 –
कंपनीने नुकतंच या कारचं अपडेटेड व्हर्जन लाँच केलं आहे, या कारवर 15 हजार रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट आणि 20 हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस ऑफर आहे.

मारुती सुझुकी स्विफ्ट –
ही कार कंपनीच्या सर्वाधिक लोकप्रिय कारपैकी एक आहे. पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही व्हेरिअंट्समध्ये उपलब्ध असलेल्या या कारवर 15 हजार रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट आणि 20 हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस मिळत आहे.

मारुती सुझुकी अल्टो K10 –
या कारचं देखील नवं व्हर्जन कंपनीने लाँच केलं आहे. कारच्या मॅन्युअल व्हर्जनवर 20 हजार आणि AMT व्हर्जनवर 25 हजार रुपयांचं डिस्काउंट मिळत आहे. याशिवाय दोन्ही व्हेरिअंट्सवर 20 हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज डिस्काउंट देखील मिळत आहे.

मारुति सुझुकी ईको –
मारुतीची ही कार कमर्शियल सेगमेंटमध्ये चांगलीच लोकप्रिय आहे. या कारवर 5 हजार रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट आणि 10 हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस देखील मिळत आहे.

मारुती सुझुकी सिलेरियो –
कंपनीकडून या कारवर 45 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळत आहे. या कारवर 25 हजार रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट आणि 20 हजारापर्यंत एक्सचेंज डिस्काउंट मिळू शकतं.

मारुती सुझुकी वॅगनआर –
नव्या अवतारात लाँच झालेल्या या कारवर कंपनीकडून कॅश डिस्काउंट देण्यात आलेलं नाही, मात्र 15 हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस मिळत आहे.

मारुती सुझुकी डिझायर –
डिझायरच्या सर्व व्हेरिअंट्सवर कंपनीकडून 20 हजार रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट आणि 20 हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस मिळत आहे.

मारुती सुझुकी व्हिटारा ब्रिझा
या कारवर कंपनीकडून 15 हजार रुपये कॅश डिस्काउंट आणि 15 हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज डिस्काउंटची ऑफर आहे.

मारुती सुझुकी इग्निस –
या कारवर देखील कंपनीकडून 15 हजार रुपये कॅश डिस्काउंट आणि 15 हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज डिस्काउंटची ऑफर आहे. याशिवाय 2 हजार 500 रुपयांपर्यंत अतिरिक्त कॉर्पोरेट डिस्काउंट देखील मिळू शकतं.

मारुती सुझुकी एस क्रॉस –
या कारवर 20 हजार रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट आणि 25 हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज डिस्काउंटची ऑफर आहे. याशिवाय ग्राहकांना 10 हजार रुपयांपर्यंत अतिरिक्त कॉर्पोरेट डिस्काउंट देखील मिळवता येईल.

मारुती सुझुकी सियाझ –
या कारवर 25 हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज डिस्काउंटची ऑफर असून अतिरिक्त 10 हजार रुपयांपर्यंत कॉर्पोरेट डिस्काउंट देखील मिळवता येईल.