News Flash

किंमत 10 हजारांहून कमी, Motorola च्या स्वस्त स्मार्टफोनचा आज ‘सेल’

Motorola चा 'बजेट' स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी

किंमत 10 हजारांहून कमी, Motorola च्या स्वस्त स्मार्टफोनचा आज ‘सेल’

Motorola चा बजेट स्मार्टफोन Moto G8 Power Lite आज(दि.30) सेलमध्ये खरेदी करण्याची संधी आहे. कंपनीने या फोनच्या विक्रीसाठी फ्लिपकार्टच्या वेबसाइटवर सेलचं आयोजन केलं आहे. दुपारी 12 वाजेपासून सेलला सुरूवात होईल. दोन महिन्यांपूर्वी कंपनीने हा फोन भारतात लाँच केला आहे. Moto G8 Power Lite स्मार्टफोनमध्ये मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि ऑक्टा-कोर MediaTek Helio P35 प्रोसेसर देण्यात आला आहे.

ऑफर :-
Moto G8 Power Lite फक्त 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज या एकाच व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे. आर्क्टिक ब्लू आणि रॉयल ब्लू अशा दोन कलर ऑप्शन्समध्ये हा फोन खरेदी करता येईल. सेलमध्ये या फोनच्या खरेदीवर काही ऑफरही आहेत. ऑफरनुसार, अ‍ॅक्सिस बँक बझ क्रेडिट कार्डद्वारे हा फोन खरेदी केल्यास 10 टक्के सूट मिळेल, तर फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डवर 5 टक्के कॅशबॅकची ऑफर आहे. याशिवाय, प्रति महिना 750 रुपये नो-कॉस्ट ईएमआयचा पर्यायही मिळेल.

Moto G8 Power Liteचे स्पेसिफिकेशन्स आणि किंमत :-
हा स्मार्टफोन अँड्रॉइड -9 पायवर कार्यरत असून 6.5 इंचाची एचडी प्लस (720×1,600 पिक्सेल) IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. 5,000mAh दमदार बॅटरी असलेल्या या फोनमध्ये यामध्ये 4GB रॅमसह MediaTek Helio P35 प्रोसेसर आहे. फोटोग्राफीसाठी मागील बाजूला ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्यातील 16MPचा मुख्य कॅमेरा आहे. याशिवाय 2MPचा मॅक्रो कॅमेरा, 2MPचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. तर, सेल्फीसाठी 8MP चा कॅमेरा आहे. Moto G8 Power Liteची इंटर्नल मेमरी 64GB आहे आणि कार्डच्या मदतीने ती 256GBपर्यंत वाढवली जाऊ शकते. कंपनीने 9 हजार 499 रुपये इतकी या फोनची किंमत ठेवली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2020 10:05 am

Web Title: motorola moto g8 power lite goes on sale in india via flipkart check price specifications and other details sas 89
Next Stories
1 पाच कॅमेऱ्यांचा Poco M2 Pro खरेदी करण्याची आज संधी, जाणून घ्या ऑफर
2 Samsung Galaxy M31s आज होणार लाँच, किंमत किती?
3 पदार्थाची चव वाढविणाऱ्या कोथिंबीरीचे गुणकारी फायदे
Just Now!
X