तुम्ही सोशल मीडियावर मुंबई पोलिसांचे अकाउंट्स फॉलो करत असाल तर तुम्ही निश्चितच त्यांच्या क्रिएटिव्हिटीचे चाहते असाल. मुंबई पोलिसांकडून प्रत्येकवेळी दाखवण्यात येणाऱ्या समयसूचकतेला आणि क्रिटिव्हीटीला A+ दर्जाचा द्यावा लागेल, या मताशी देखील तुम्ही निश्चितच सहमत व्हाल. कारण, आपल्या सूचना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी किंवा एखाद्या विषयावर जागरूकता पसरवण्यासाठी मुंबई पोलिसांकडून सोशल मीडियाचा उत्तमरीत्या वापर जातो. नवनवीन युक्त्या आणि अगदी कोणालाही पटकन रिलेट होईल अशी साधी सोपी भाषा ही त्यांची खासियत आहे. मुंबई पोलिसांनी आता अशाच आपल्या खास स्टाईलमध्ये एक नवी पोस्ट केली आहे. मात्र, यावेळी मुंबई पोलीस आपल्या अस्वस्थेबाबत सांगू पाहत आहेत. कारण काय? पाहुया

“आम्हाला अस्वस्थ करणारी छायाचित्रं : ४ भागांची मालिका”

मुंबई पोलिसांनी सोशल मीडियावर नुकतेच त्यांना अस्वस्थ करणारे काही फोटोज टाकले आहेत. हे एकूण ४ फोटोज आहेत. मुंबई पोलिसांनी आपल्या इंस्टाग्रामवर अकाउंटवर शेअर केलेल्या या ४ फोटोजच्या पोस्टला कॅप्शन दिलं आहे, “आम्हाला अस्वस्थ करणारी छायाचित्रं : ४ भागांची मालिका.” या फोटोजमध्ये आपण पाहू शकता कि, लोकांची मास्क घालण्याची चुकीची पद्धत, वारंवार वाहतुकीचे नियम मोडण्याची सवय आणि ड्रग ऍडिक्शन अशा अत्यंत महत्त्वपूर्ण विषयांवर यावेळी मुंबई पोलिसांनी अत्यंत मार्मिकपणे प्रकाश टाकला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mumbai Police (@mumbaipolice)


जवळपास २४ तासांपूर्वी शेअर केलेल्या या पोस्टला २३,००० हून अधिक जणांची पसंती मिळाली आहे आणि संख्या सातत्याने वाढतच आहे. त्याचसोबत नेटिझन्सकडून मुंबई पोलिसांचं कौतुक करणाऱ्या अनेक प्रतिक्रिया देखील आल्या आहेत. मुंबई पोलिसांच्या या पोस्टवर एका इन्टाग्राम युजरने लिहिलं आहे कि, “शेवटचा फोटो अनपेक्षित होता.” तर दुसऱ्याने म्हटलं कि, “मुंबई पोलिस हे नेहमीच महत्त्वाच्या विषयांवर जागरूकता पसरवण्यात अत्यंत क्रिएटिव्ह आणि उपयुक्त पोस्ट करत असतात. यासाठी तुमचे खूप खूप आभार.” दरम्यान, मुंबई पोलिसांच्या या पोस्टबद्दल आणि क्रिएटिव्हिटीबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं?