सामान्यपणे हिवाळा किंवा पावसाळा अशा ऋतूंमध्ये सरपटणारे प्राणी भक्ष्याच्या शोधामध्ये बाहेर येतात. वाढत्या शहरीकरणामुळे जंगलांची संख्या कमी होऊ लागली आहे. त्यामुळे जंगलामध्ये वास्तव्य करणारे हे प्राणी भक्ष्याच्या शोधामध्ये शहरी भागामध्ये येऊ लागले आहेत. अनेक वेळा हे जीव स्वत:चा जीव वाचविण्यासाठी माणसांवर हल्ला करतात. त्यामुळे भितीपोटी माणूस त्यांना मारण्याचा प्रयत्न करतो. यामध्ये सापांचं प्रमाण जास्त आहे. साप दंश करतो या भीतीमुळे अनेक जण त्यांना पाहिल्यानंतर मारण्याचा प्रयत्न करताता. मात्र तेदेखील स्वत:च संरक्षण करण्यासाठी माणसाला दंश करतो. विशेष म्हणजे सापाने दंश केल्यानंतर अनेक जण शरिरातून विष बाहेर काढण्यासाठी ना-ना विविध उपाय करण्याचा प्रयत्न करतो. मात्र योग्य उपचार पद्धती माहित नसल्यामुळे दंश झालेल्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे साप चावल्यानंतर काही गोष्टी या कटाक्षाने टाळाव्यात.

१. साप चावल्यानंतर दंश झालेल्या ठिकाणी कधीही पट्टी किंवा रुमाल बांधू नये. पट्टी बांधल्यानंतर त्या जागेवरील रक्तदाब वाढतो आणि रक्तपुरवठा करणारी नस तुटण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.

Two houses destroyed, cylinder explosion,
देव तारी त्याला कोण मारी… सिलिंडरच्या स्फोटात दोन घर खाक, तान्हुले बाळ बचावले
father beaten
वसई : मुलीचे अपहरण केल्यानंतर पित्याला बेदम मारहाण, नया नगर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा
Afgan Women
‘व्याभिचार केल्यास महिलांना खुलेआम दगडाने ठेचून मारले जाणार’ तालिबानची घोषणा
A minor girl commits suicide due to not being able to bear the pain of menstruation Mumbai
मुंबई: मासिक पाळीचा त्रास सहन न झाल्याने अल्पवयीन मुलीची आत्महत्या

२. साप चावल्यानंतर त्या व्यक्तीला कधीही आडवं झोपवू नये. असं केल्यामुळे रक्तप्रवाहावर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अशा व्यक्तीला कायम सरळ झोपवावं.

३. अनेक वेळा साप चावल्यानंतर तात्काळ उपचार म्हणून काही ठराविक गोळ्या रुग्णाला दिल्या जातात. यामध्ये एस्प्रिन या गोळीचा जास्त वापर करण्यात येतो. मात्र या गोळ्या देऊ नयेत. कारण त्या रुग्णाची त्यावेळी काय अवस्था आहे हे सांगता येऊ शकत नाही. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय रुग्णाला कोणत्याही गोळ्या देऊ नये.

४. सापने दंश केलेल्या ठिकाणी अनेक जण सुरी किंवा चाकूच्या सहाय्याने जखम मोठी करुन त्यातून रक्त बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र असं कधीही करु नये. असं केल्यामुळे जखम मोठी होते आणि सापाचं विष शरीरामध्ये जलद गतीने पसरतं.

५. साप चावल्यानंतर रुग्णाची जास्त हालचाल करु नये. त्यामुळे शरीराची हालचाल होऊन विष रक्ताच्या सहाय्याने शरीरात जलद गतीने पसरते.