News Flash

फेसबुक लाईव्हमधले नवीन फिचर्स माहितीयेत ?

व्हिडिओ कॉलिंगमध्ये काही खास सुविधा

फेसबुक लाईव्हमधले नवीन फिचर्स माहितीयेत ?
जगात सध्या सर्वाधिक कोणती सोशल साईट वापरली जात असेल तर ती फेसबुक आहे. आपल्या फिचर्समध्ये सातत्याने बदल करत असल्याने नेटीझन्सची या साईटला मोठी पसंती असल्याचे दिसते. तरुणांबरोबरच सर्वच वयोगटात अगदी कमी कालावधीत स्थान मिळविलेल्या फेसबुकने कायमच आपल्या वापरकर्त्यांना खूश केले आहे. आता फेसबुक आणखी काही नवीन फिचर्स लाँच करणार असल्याचे कंपनीने नुकतेच जाहीर केले आहे. ही फीचर्स फेसबुक लाईव्हच्या संदर्भातील असतील.

याआधी फेसबुकने ‘Live Chat With Friends’ आणि ‘Live With’ असे दोन पर्याय आपल्या युजर्सना उपलब्ध करुन दिले होते. लाईव्ह व्हिडिओ पर्यायाचा वापर अधिकाअधिक चांगल्या प्रकारे करावा यासाठी हे दोन नवे पर्याय देण्यात आले होते. ज्यांना व्हिडिओ कॉल करायला आवडते त्यांच्यासाठी आता नव्याने आलेले फिचर्स अतिशय फायदेशीर ठरणार आहेत.
या नव्या फीचरमुळे फेसबुक वापरणाऱ्यांना लाईव्ह ब्रॉडकास्टशी सहज कनेक्ट होता येणार आहे.  या फिचरची आता चाचणी चालू असून वर्षाच्या अखेरीस ते वापरासाठी उपलब्ध होणार आहे. काय आहे हे फिचर जाणून घेऊया…


नव्याने आलेल्या या फिचरमुळे व्हिडिओ कॉल चालू असताना तुम्ही अॅनिमेटेड रिअॅक्शन, फिल्टर मास्क आणि इतर इफेक्टस देता येणार आहेत. दोन व्यक्ती या चॅटव्दारे एकमेकांशी संवाद साधत असतील तर किंवा ग्रुपमध्ये बोलत असतील तरीही त्यांना स्क्रीन शॉट घेता येईल. आपण एडीट केलेली इमेज दुसऱ्यांना दिसण्याआधी कशी दिसेल हेही आपल्याला पाहता येणार आहे.  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2017 5:12 pm

Web Title: new features of facebook live video chat
Next Stories
1 मोबाईलच्या IMEI क्रमांकाशी छेडछाड कराल तर ३ वर्षांचा तुरुंगवास?
2 पावसाळ्यात ‘अशी’ घ्या आरोग्याची काळजी
3 व्हॉटसअॅपमधले ‘हे’ फीचर्स तुम्हाला माहितीयेत?
Just Now!
X