टेलिकॉम कंपनी भारती एअरटेलच्या ग्राहकांसाठी खुशखबर आहे . एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी अनलिमिटेड इंटरनेटची ऑफर आणली आहे. एअरटेलच्या प्रीपेड युजर्ससाठी ही ऑफर असणार आहे. यासाठी कंपनी अतिरिक्त पैसैही आकारणार नाहीये. रोजचं इंटरनेटचं लिमिट संपल्यानंतर आता इंटरनेट बंद होणार नाही तर इंटरनेटचा स्पीड फक्त कमी होऊन 128Kbps होईल.

ही ऑफर 199 किंवा त्यापेक्षा जास्तीचं रिचार्ज करणाऱ्यांसाठी असणार आहे. एअरटेलच्या आधीपासून रिलायन्स जिओ अशाप्रकारची सेवा देत आहे. मात्र, जिओचा इंटरनेट स्पीड एअरटेलपेक्षा दुपटीने कमी आहे. कारण दिवसाचं लिमिट संपल्यावर जिओचा स्पीड केवळ 64Kbps मिळतो.

Airtel 199 Plan – या प्लॅनमध्ये ग्राहकांना रोजच्या वापरासाठी 1.4GB हायस्पीड इंटरनेट दिलं जातं. याशिवाय यामध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही दिली जाते. तसंच रोज 100 SMS आणि एअरटेल टीव्ही, म्युझिक यांसारखे एअरटेलचे अॅप्सचं सबस्क्रिप्शन फ्रीमध्ये दिलं जातं. या प्लॅनची 28 दिवसांची वैधता आहे.

यापूर्वी, रिलायन्स जिओने भारती एअरटेलच्या विरोधात एक तक्रार दाखल केली आहे. यामध्ये करण्यात आलेल्या आरोपानुसार, एअरटेल कंपनी अॅपल वॉच सिरीज ३ वर ई सिमची ऑफर देणार आहे, ज्यामध्ये लायसन्सच्या नियमांचे उल्लंघन करण्यात येत असल्याचा आरोप जिओने केला आहे. त्यामुळे जिओने एअरटेलच्या या सेवा तत्काळ बंद कऱण्याची मागणी केली आहे. मात्र एअरटेलकडून याबाबत अद्याप कोणतेही उत्तर आलेले नसल्याचे सांगण्यात आले आहे.

रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेल दोन्ही कंपन्या ११ मे पासून आपल्या विक्री चॅनेलच्या माध्यमातून अॅपल वॉट सिरीज ३ ची ऑफर देत आहेत. या माध्यमातून ग्राहक आपला आयफोन आणि अॅपलवॉच सामायिक करु शकणार आहेत. ई सिमच्या माध्यमातून ग्राहक आयफोन आणि अॅपल वॉच एकत्रितपणे वापरता येणार आहे. तसेच इतर उपकरणांवरुन येणारे कॉलही या वॉचच्या माध्यमातून उचलता येणार आहेत. वायरलेसच्या मार्फत ई-सिमला आयफोनबरोबर जोडता येणार आहे. ई-सिमच्या ओळखीसाठी नेटवर्क आणि वापरकर्त्याची माहिती प्रायोगिकतत्वावर वापरण्यात येणार आहे. यात युजरची माहिती तसेच सिम कार्डची माहिती देण्यात येणार आहे.