मोबाइल नंबर पोर्टेबिलिटीसाठी (MNP)लवकरच नवे नियम लागू होणार आहेत. नवे नियम लागू झाल्यानंतर ग्राहकांना दुसऱ्या क्रमांकात पोर्ट करण्यासाठी केवळ दोन दिवस लागणार आहेत. 16 डिसेंबर पासून नवे नियम लागू करण्याचा निर्णय टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाने (TRAI)घेतला आहे.

आतापर्यंत मोबाइक क्रमांक दुसऱ्या क्रमांकात पोर्ट करण्यासाठी एका आठवड्याचा कालावधी लागायचा. पण नव्या नियमांनंतर केवळ दोन दिवसांचा वेळ लागेल. तर, एकाच सर्कलमधून दुसऱ्या सर्कलमध्ये नंबर पोर्ट करण्यासाठी नवे नियम लागू झाल्यानंतर 5 दिवस लागणार आहेत.

यापूर्वी ११ नोव्हेंबरपासून हा नियम लागू होणार होता. पण, आता १६ तारखेपासून हा नियम लागू होणार असल्याचं ट्रायने स्पष्ट केलंय. टेस्टिंग प्रोसेसमध्ये वेळ लागल्याने नियम लागू करण्यास उशीर झाल्याचं ट्रायने सांगितलं. आधीपेक्षा अधिक जलदगतीने आणि कार्यक्षमरित्या ही प्रक्रिया पार पडेल.