News Flash

अनुवांशिक लठ्ठपणाच्या उपचारासाठी नवे औषध

अनुवांशिक लठ्ठपणाचा उपचार करणारे औषध संशोधकांना आढळले

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

अनुवांशिक लठ्ठपणाचा उपचार करणारे औषध संशोधकांना आढळले असून यामुळे व्यक्तीच्या भुकेवर नियंत्रण ठेवून त्याचे वजन कमी करता येणार आहे. लठ्ठपणा असलेल्या लोकांपैकी दोन ते सहा टक्के लोकांच्या भुकेच्या जनुकांमध्ये उत्परिवर्तन होते. यामुळे त्यांच्यामध्ये लठ्ठपणा विकसित होण्याची अधिक शक्यता असते. याला मोनोजेनिक लठ्ठपणादेखील म्हटले जाते. अशा प्रकारचा लठ्ठपणा असलेले लोक सद्य:स्थितीत उपलब्ध असणाऱ्या उपचारांना चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत नाहीत. आहारावर नियंत्रण आणि शस्त्रक्रियेमुळे या लोकांचे वजन कमी करण्यात मदत होते, मात्र त्यांना वजनावर नियंत्रण ठेवता येत नसल्याने याचे दीर्घकालीन प्रभाव चांगले नाहीत. अनुवांशिक लठ्ठपणा असणारे लोक लिराग्लुटाइड या औषधाच्या मदतीने वजन कमी करू शकत असल्याचे डेन्मार्कमधील कोपेनहेगन विद्यापीठातील संशोधकांना आढळले आहे. हे औषध  ‘जीएलपी-१’ या भुकेवर आळा घालणाऱ्या संप्रेरकामध्ये बदल करून तयार करण्यात आले आहे.

यामुळे लठ्ठ लोकांना जास्त भूक लागत नसून चार महिन्यांच्या आत त्यांच्या एकूण वजनाच्या सहा टक्के वजन कमी करू शकतात. साइन सोरेनसन टोरेकोव यांनी सांगितले. हा अभ्यास ‘सेल मेटाबॉलिस्म’ या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आला आहे. संशोधकांनी रोगजन्य म्युटेशनमुळे लठ्ठपणा झालेल्या १४ आणि कोणत्याही प्रकारचे म्युटेशन न होता लठ्ठपणा झालेल्या २८ लोकांचा अभ्यास केला. या दोन्ही गटांना एकाच प्रकारचा आहार देण्यात आला त्याचप्रमाणे त्यांच्यावर एकसारखे औषधोपचार करण्यात आले. या वेळी मोनोजेनिक लठ्ठपणा असणाऱ्यांनी चार महिन्यांत सात किलो वजन घटवले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2018 12:58 am

Web Title: obesity medicine
Next Stories
1 Maharashtra MSBSHSE SSC 10th Result 2018 : कॉलेज निवडताना ‘या’ गोष्टी नक्की लक्षात ठेवा !
2 Maharashtra MSBSHSE SSC 10th Result 2018 : तुम्हालाही अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले आहेत?
3 हृदयाच्या तारुण्यासाठी सात तास झोप आवश्यक
Just Now!
X