जर तुम्ही मोबाइल, डीटीएच आणि ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शनसाठी वेगवेगळे रिचार्ज करुन वैतागला असाल तर, Airtel तुमच्यासाठी एक झकास प्लॅन आणायच्या तयारीत आहे. ‘One Airtel’ नावाच्या या प्लॅनमध्ये कंपनीकडून एकाचवेळी पोस्टपेड, डीटीएच, ब्रॉडबँड आणि लँडलाइन सर्व्हिसची ऑफर दिली जाईल. या महिन्याच्या अखेरपर्यंत कंपनी हा प्लॅन आणायची शक्यता आहे. सविस्तर जाणून घेऊया कंपनी या प्लॅनमध्ये काय बेनिफिट्स देणार आहे आणि कोणत्या युजर्ससाठी हा बेस्ट प्लॅन ठरु शकतो.

काय आहे वन एअरटेल प्लॅन –
सध्या एअरटेल कंपनी टेलिकॉमशिवाय एअरटेल डिजिटल टीव्हीमार्फत डीटीएच आणि एक्सट्रीम फायबरची 1Gbps स्पीडपर्यंत इंटरनेट सर्व्हिस देते. या सर्व सेवांसाठी युजर्सना वेगवेगळे सब्सक्रिप्शन किंवा रिचार्ज करावे लागते. पण, आता कंपनीने वन एअरटेल प्लॅनमध्ये सर्व सर्व्हिस एकत्र ऑफर करण्याचा प्रयत्न केला आहे. या प्लॅनसाठी सब्सक्राइब करणारे युजर आता एकाच प्लॅनमध्ये चारही सेवांचा लाभ घेवू शकतात. कंपनीने या प्लॅनचे जे पोस्टर जारी केले आहे त्यानुसार, यामध्ये युजर्सना वन बिल, वन कॉल सेंटर, झीरो स्विचिंग कॉस्ट यांसारख्या नवीन आणि विशेष सेवा मिळतील. वन एअरटेलच्या बेसिक प्लॅनमध्ये पोस्टपेड प्लॅनचे बेनिफिट्स मिळतील. यात अनलिमिटेड कॉलिंगसोबत रोलओव्हर सेवेसह 85जीबी डेटा वापरायला मिळेल. या प्लॅनमध्ये 500 रुपयांचे एअरटेल डिजिटल टीव्ही एचडी चॅनल पॅकही मिळेल. डेटासाठी यामध्ये 100Mbps स्पीड आणि 500GB डेटाचा एअरटेल एक्सट्रीम फायबरचा प्लॅन मिळेल. याशिवाय, या प्लॅनमध्ये एअरटेल अनलिमिटेड कॉलिंग लँडलाइन सेवेचाही लाभ मिळेल.

आणखी वाचा- Jio ची ‘या’ स्मार्टफोन युजर्ससाठी भन्नाट ऑफर, मिळेल दुप्पट डेटासह एक वर्षाची फ्री सर्व्हिसही

91 मोबाइल्सच्या वृत्तानुसार, कंपनी दोन एअरटेल वन प्लॅन आणायची शक्यता आहे. प्लॅन्सची किंमत किती असेल याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही, पण बेसिक प्लॅन 1,000 रुपयांचा असू शकतो. मात्र, यामध्ये कंपनी ब्रॉडबँड सेवा देणार नाही. तर, दुसरा प्लॅन 1,500 रुपयांचा असू शकतो. यामध्ये वर नमूद केलेले सर्व बेनिफिट्स मिळतील. या प्लॅन्सची अजून एक खासियत म्हणजे या दोन्ही प्लॅनमध्ये फ्री ओटीटी सर्व्हिसही मिळेल.