OnePlus 6T  Launch Event : वनप्लस कंपनी OnePlus 6 ची पुढील आवृत्ती OnePlus 6T भारतामध्ये लाँच करण्याच्या तयारीमध्ये आहे. गेल्या काही दिवसांपासून OnePlus 6T या फ्लॅगशिप फोनबद्दल अनेक माहिती समोर आली आहे. टेलिकॉम क्षेत्रातील जाणकरांच्या माहितीप्रमाणे OnePlus 6T हा फोन भारतामध्ये १७ ऑक्टोबर रोजी लाँच केला जाणार आहे. OnePlus 6T लाँचिंगची कार्यक्रम पत्रिका लीक झाली.

चीनमधील सोशल मीडियावर OnePlus 6T ची लाँचिंग पत्रिका लीक झाली आहे. यामध्ये कंपनीने नवी टॅगलाईन “Unlock The Speed” चा वापर केला आहे. इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरककडे “Unlock The Speed” चा कल दिसून येतोय. कंपीनीने यामध्ये काही अमुलाग्र बदल केल्याचे बोलले जात आहे. OnePlus 6T या फोनचे काही फोटोही समोर आले आहेत. त्यानुसार फोनच्या मागील बाजूला तीन सेंसर आहेत. हा फोन ड्युअल रियर कॅमेरा सेटअप फोन आहे. समोर आलेल्या फोटोनुसार, या फोनला मागील बाजूला तीन कॅमेरा आहेत.

वनप्लसद्वारा जारी केलेल्या टीजरनुसार, OnePlus 6Tमध्ये 3.5 एमएम हेडफोन जॅक नसेल. हा फोन यूएसबी टाइप-सी ईअरफोनसोबत येईल. OnePlus 6Tमध्ये वनप्लस 6 सारखे स्नॅपड्रॅगन ८४५ प्रोसेसर आणि ८ जीबी रॅम असणार आहे. याशिवाय फोनमध्ये अँड्रॉइडचे 9.0 चे व्हर्जन अशेल. या फोनची किंमत अंदाजे ४० हजार रूपये असण्याची शक्यता आहे.