06 March 2021

News Flash

अ‍ॅपल, सॅमसंगला झटका ; ‘हा’ ठरला भारताचा ‘नंबर वन प्रीमियम स्मार्टफोन ब्रँड’

सॅमसंग दुसऱ्या क्रमांकावर, तर iPhone बनवणारी अ‍ॅपल कंपनी तिसऱ्या क्रमांकावर

(प्रातिनिधिक छायाचित्र)

स्मार्टफोन बनवणारी Oneplus कंपनी भारतीय बाजारात प्रीमियम स्मार्टफोन सेगमेंटमध्ये(30 हजार रुपये किंवा जवळपास 400 डॉलरपेक्षा जास्त किंमत असलेले) पहिल्या क्रमांकाची कंपनी ठरली आहे. काउंटरपॉइंट एनालिसिसच्या रिपोर्टनुसार, 2020 च्या दुसऱ्या तिमाहीत प्रीमियम स्मार्टफोन मार्केटमध्ये वनप्लसची हिस्सेदारी 29.3 टक्के राहिली. कंपनीच्या नंबर एक प्रीमियम स्मार्टफोन ब्रँड बनण्यामागे नुकताच लाँच झालेल्या Oneplus 8 सीरिजचा मोठा हात आहे. एप्रिल 2020 मध्ये लाँच झालेल्या या फोनला भारतीय बाजारात शानदार प्रतिसाद मिळाला आहे.

काउंटरपॉइंटच्या रिपोर्टनुसार, 2020 च्या दुसऱ्या तिमाहीत वनप्लसची इंडियन मार्केटमधील हिस्सेदारी 29.3 टक्के नोंदवण्यात आली आहे. अन्य कोणत्याही कंपनीपेक्षा वनप्लसची हिस्सेदारी जास्त आहे. कंपनीचा वनप्लस 8 डिव्हाइस प्रीमियम सेगमेंटमध्ये नंबर एक स्मार्टफोन ठरलाय. बाजारात या फोनची 19 टक्के हिस्सेदारी आहे. याशिवाय वनप्लस 8 प्रो डिव्हाइस अल्ट्रा-प्रीमियम सेगमेंटमध्ये( 45 हजार रुपये किंवा जवळपास 600 डॉलरपेक्षा जास्त किंमत असलेले) दुसऱ्या क्रमांकाचा बेस्ट सेलिंग स्मार्टफोन ठरला. या दोन्ही स्मार्टफोनमध्ये 5जी कनेक्टिव्हिटी आहे.

(स्वस्त ‘वनप्लस नॉर्ड’ आता Open Sale मध्ये, जिओ युजर्सना 6,000 रुपयांपर्यत ‘बेनिफिट्स’ची ऑफर)

प्रीमियम सेगमेंटमध्ये दुसऱ्या नंबरवर सॅमसंग :-
तर, प्रीमियम सेगमेंटमध्ये सॅमसंग कंपनी 1 टक्क्यापेक्षा कमी फरकाने दुसऱ्या नंबरवर आहे. या सेगमेंटमध्ये सॅमसंगची हिस्सेदारी जवळपास 29 टक्के ठरली. Galaxy A71, कंपनीचा बेस्ट सेलिंग डिव्हाइस म्हणून समोर आला असून 2020 च्या दुसऱ्या तिमाहीत प्रीमियम सेगमेंटच्या टॉप 3 मॉडेल्समध्ये या फोनने स्थान मिळवलं आहे. तर, प्रीमियम सेगमेंटमध्ये iPhone बनवणारी अॅपल कंपनी तिसऱ्या स्थानावर आहे. मागच्या तिमाहीत बेस्टि सेलिंग मॉडेल ठरलेला iPhone 11 पाचव्या क्रमांकावर गेला आहे. पण अल्ट्रा प्रीमियम सेगमेंटमध्ये हा फोन पहिल्या नंबरवर कायम आहे. याशिवाय, iPhone SE 2020 मॉडेललाही चांगला प्रतिसाद मिळाला असून सेगमेंटच्या टॉप 5 मॉडेल्समध्ये आपली जागा पक्की केली आहे.

(स्वस्त ‘वनप्लस नॉर्ड’ आता Open Sale मध्ये, जिओ युजर्सना 6,000 रुपयांपर्यत ‘बेनिफिट्स’ची ऑफर)

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 3, 2020 11:06 am

Web Title: oneplus top indias premium smartphone segment in q2 2020 check details sas 89
Next Stories
1 माइक्रोसॉफ्ट खरेदी करणार चिनी अ‍ॅप टिकटॉकचा अमेरिकेतील व्यवसाय!
2 64 MP कॅमेऱ्याचा Motorola one fusion+ खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या ऑफर्स
3 Whatsapp : 138 नवीन Emoji, चॅटिंग होणार अजून मजेशीर
Just Now!
X