इंटरनेटच्या माध्यमातून सगळे जग एका ‘ग्लोबल व्हिलेज’च्या रूपात परावर्तित झाले आहे. त्यामुळे ‘ग्लोबल भारतीय’ बनण्याचे स्वप्न बघणाऱ्या तरुणाला स्वतःचे व्यावसायिक कौशल्य विकसित करण्यासाठी इंटरनेटने लॉकडाउनच्या कालावधीत वेगवेगळ्या वेबसाईट्सवर विविध विषयांवरचे कोर्सेस उपलब्ध करून दिले आहेत. आपापल्या आवडीच्या विषयानुसार कोर्सची निवड करून तो कोर्स मोफत स्वरूपात पूर्ण करता येतो किंवा एखादे इन्स्टिट्यूट किमान फी आकारते. बहुतांश हे कोर्सेस नामांकित विद्यापीठांनी तयार केले असल्यामुळे त्याचा शैक्षणिक दर्जा उत्तम आहे. विविध असाइन्मेंट्स आणि प्रत्येक मोड्युल अथवा पाठाच्या शेवटी असणाऱ्या प्रश्नमंजुषेमुळे हे कोर्सेस करिअरचा आलेख उंचावयाचे ध्येय ठेवणाऱ्या तरुणांना निश्चित उपयुक्त आहेत.

अशा कोर्सेस ऑनलाईन शिकवणाऱ्या विविध वेबसाइट्स कोणत्या?

१. गुगल कोर्सेस

गुगलने देखील ऑनलाईन शिक्षणाच्या क्षेत्रात आपले अव्वल स्थान निर्माण केले आहे. learndigital.withgoogle.com या वेबसाइटवर विविध विषयांवरचे १२५ गुगल कोर्सेस उपलब्ध आहेत. आपल्या आवडत्या विषयासंबंधीचे मॉड्युल आणि वैयक्तिक वेळेच्या नियोजनानुसार तुम्ही हे कोर्सेस पूर्ण करू शकतात. तसेच कोर्स सर्टिफिकेट मिळण्यासाठी कोर्सच्या शेवटी दिलेली क्विझ किंवा प्रश्नमंजुषा पूर्ण करणे गरजेचे आहे.
गूगल कोर्सेस पुढीलप्रमाणे आहेत-

१. फंडामेंटल्स ऑफ डिजिटल मार्केटिंग २.गेट बिसिनेस ऑनलाईन ३. इंप्रुव्ह युअर ऑनलाईन सिक्युरिटी ४. इफेक्टिव्ह नेटवर्किंग ५. बिझिनेस कम्युनिकेशन६. सोशल सायकोलॉजी ७. टेक्निकल सपोर्ट फंडामेंटल ८. फंडामेंटल्स ऑफ ग्राफिक डिझाईन ९. इंग्लिश फॉर करियर डेव्हलपमेंट १०. बिझिनेस रायटिंग इत्यादी.

२. टाटा ई -लर्निंग कोर्सेस

टाटा ई -लर्निंग कोर्सेस हे बहुतांशी टेक्निकल आहेत. या कोर्सेसचा उद्देश कौशल्य विकसित करणे असून त्यांची फी केवळ नाममात्र रुपये तीनशे आहे.
पुढील विषयांसाठी ऑनलाईन कोर्सेस उपलब्ध आहेत-
इण्डस्ट्री ४.० (२महिने/३००रुपये फी ) ( http://www.youtube.com/watch?v=mD9wLNNPK7g)ही डेमो लिंक चेक करू शकता

टोटल क्वालिटी मॅनेजमेंट(२महिने/३००रुपये फी)( https://youtu.be/JxUA4jvycOI ) ही डेमो लिंक चेक करू शकता

इंग्लिश प्रोफिशिअन्सी ((२महिने/३००रुपये फी)

मेकॅनिकल (या विषयांतर्गत १४कोर्सेस आहेत)

मेटॅलर्जी (या विषयांतर्गत ७ कोर्सेस आहेत)

इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स (या विषयांतर्गत १२ कोर्सेस आहेत)

कम्प्युटर सायन्स (या विषयांतर्गत एम एस ऑफिस, अॅडव्हान्स एक्सेल, मशीन लर्निंग)

मॅनेजर (बिझनेस स्किल्स फॉर मॅनेजर्स-फी रुपये ३०००/१२महिने)

३. स्वयं कोर्सेस (https://swayam.gov.in/)

स्वयं कोर्सेस हा भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा उपक्रम असून ५०० हून अधिक ‘फ्री’ कोर्सेस या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे हे कोर्सेस बंगाली, मराठी, गुजराती, तामिळ, तेलुगू, हिंदी, कन्नड अशा आठ भाषांमध्ये उपलब्ध आहेत.

या वेबसाईटवर पुढील विषयाचे कोर्सेस उपलब्ध आहेत.
प्रोग्रामिंग C++, क्लाउड कम्प्युटिंग, इंट्रोडक्शन टू इंटरनेट, मॉडर्न अल्जेब्रा, सॉफ्ट स्किल्स, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, इंट्रोडक्शन टु रिसर्च मेथोडॉलॉजी, लँग्वेज अँड माईंड, इमोशनल इंटेलिजन्स इत्यादी.
या कोर्सेसचं वैशिष्ट्य म्हणजे या अंतर्गत ई-बुक्स आणि व्हिडिओ लेक्चर्स उपलब्ध आहेत.

४. कोर्सेरा (https://www.coursera.org/)

कोर्सेरा कोर्सेसचे निर्माण जगातील नामांकित विद्यापीठांनी आणि कंपन्यांनी होतकरू तरुणांना त्यांच्या उपयुक्त करिअरमध्ये ‘स्किल डेव्हलपमेंट’ (कौशल्य विकास)साठी उपयोग होईल यासाठी केले आहेत. आयबीएम, युनिव्हर्सिटी ऑफ मॅसेंच्युएट्स, युनिव्हर्सिटी ऑफ टोरोंटो, युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टन, युनिव्हर्सिटी ऑफ पेनिसिल्व्हिया इत्यादींचा त्यात समावेश होतो. हे कोर्स पूर्ण करून कोर्सच्या स्वरूपानुसार अथवा टाइपनुसार सर्टिफिकेट, डिप्लोमा किंवा डिग्री एखादा तरुण अथवा तरुणी प्राप्त करू शकतो/शकते. यातील काही कोर्सेस मोफत असून काहींसाठी फी आकारली जाते.

कोर्सेरा पुढील विषयाचे कोर्सेस आयोजित करतात-
आर्ट अँड हुमॅनिटीज (हिस्टरी,फिलॉसॉफी,म्युझिक अँड आर्ट), बिझनेस (लीडरशिप मॅनेजमेंट, फायनान्स, मार्केटिंग, बिझनेस स्ट्रॅटेजी इत्यादी), डेटा सायन्स (पायथॉन, एक्सेल, SQL, Tableau, TensorFlow, आर्टिफिशल इंटेलिजन्स, इत्यादी), कम्प्युटर सायन्स (जावा, C++, ब्लॉकचेन, HTML, Agile इत्यादी), इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी (AWS, सायबर सिक्युरिटी, गुगल , SAP), हेल्थ (बेसिक सायन्स, हेल्थ इन्फोमॅटीक्स, हेल्थकेअर मॅनेजमेंट, नुट्रीशन, पेशंट केयर इत्यादी), फिजिकल सायन्स अँड इंजिनीरिंग (इलेट्रीकल इंजिनीरिंग, मेकॅनिकल इंजिनीरिंग, केमिस्ट्री , फिसिक्स अँड ऍस्ट्रॉनॉमी इत्यादी), सोशल सायन्सेस

५. खान अकॅडेमी ( http://www.khanacademy.org )

खान अकॅडेमी मुळात लर्निंग रिसोर्सेसची लायब्ररी आहे. शालेय आणि महाविद्यालयीन विदयार्थ्यांसाठी त्यांच्या इयत्तेप्रमाणे विषयांची मांडणी केली आहे. इयत्ता पहिलीपासून ते बारावी पर्यंत गणित विषयावरच्या व्हिडीओ लेक्चरची सुविधा उपलब्ध आहे. तसेच नववी ते बारावी पर्यंत सायन्स विषयावर व्हिडीओ लेक्चर्स उपलब्ध आहेत. (IIT-JEE) तसेच SAT, GMAT या परीक्षांची तयारी ऑनलाईन करून घेतली जाते. हे कोर्सेस मोफत असून आपण आपल्या वेळेच्या नियोजनानुसार आणि सोयीप्रमाणे पूर्ण करू शकतात.

६. ओपन कल्चर कोर्सेस (http://www.openculture.com/freeonlinecourses)

ओपन कल्चर कोर्सेस हे विविध विषयांवर रिसोर्स कोर्स वेब पोर्टल आहे. या वेबसाईटवर तुम्ही जसे विविध विषयावरचे कोर्सेस पाहाल तसेच त्या कोर्सच्या अनुषंगाने त्या विषयावरचे पॉडकास्ट, ऑडिओबुक्स व ई-बुक्स पाहू शकतात. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांमध्ये हे कोर्स पोर्टल प्रसिद्ध आहे. आर्ट अँड आर्ट हिस्टरी, ऍस्ट्रॉनॉमी, बायलॉजी, बिझनेस, केमिस्ट्री, प्राचीन जग, इंजिनीरिंग, कम्प्युटर सायन्स इत्यादी विषयांवर मोफक कोर्सेस उपलब्ध आहेत.

७. युडेमी ( https://www.udemy.com/)

युडेमी ऑनलाईन कोर्सेस केवळ मात्र रुपये ४२० रुपये फीच्या माफक दरात उपलब्ध आहेत आणि http://www.udemy.com या वेब संकेतस्थळावर जाऊन कॅटेगरीज या ऑप्शनवर क्लिक करून आपल्या आवडीचा कोर्स निवडू शकता.

८. मोफत कोर्सेस देणारे अन्य वेबसाईट्स पुढीलप्रमाणे आहेत-

स्टॅनफॉर्ड युनिव्हर्सिटी फ्री कोर्सेस ( https://online.stanford.edu/free-courses)
हॉवर्ड युनिव्हर्सिटी (https://online-learning.harvard.edu/catalog/free)
ओपन याले युनिव्हर्सिटी (https://oyc.yale.edu/)
युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया (https://extension.berkeley.edu/)
MIT ओपनवेर कोर्सेस ( https://ocw.mit.edu/index.htm)
युनिव्हर्सिटी ऑफ लंडन पॉडकास्ट (https://podcasts.ox.ac.uk/series) ही वेबसाईट विविध विषयांवरच्या पॉडकास्टसाठी प्रसिध्द आहे.

– गौरीता मांजरेकर,
gauritamanjrekar9@gmail.com