Oppo कंपनीने अ‍ॅमेझॉन प्राईम डे सेलमध्ये आपला Oppo A52 हा स्मार्टफोन भारतात 8 जीबी रॅम या नवीन व्हेरिअंटमध्ये लाँच केला आहे. हा फोन कंपनीने जून महिन्यात 6 जीबी रॅम ऑप्शनसह आणला होता. जुन्या व्हेरिअंटप्रमाणेच यामध्ये 128 जीबी इंटर्नल स्टोरेज आहे. या स्मार्टफोनमध्ये पंच-होल डिस्प्ले, क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप आणि 18w फास्ट चार्जिंग सपोर्ट असे दमदार फीचर्स आहेत.

स्पेसिफिकेशन्स :–
ओप्पो ए52 Android 10 वर आधारित ColourOS 7.1 वर कार्यरत आहे. यामध्ये 6.5 इंच (1,080×2,400 पिक्सल) डिस्प्ले असून क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 665 प्रोसेसर दिलं आहे. या फोनमध्ये मागील बाजूला क्वॉड कॅमेरा सेटअप आहे. यात प्राइमरी कॅमेऱ्यात 12-मेगापिक्सल सेंसर आणि सेकंडरीमध्ये 8-मेगापिक्सल सेन्सरचा समावेश आहे. फ्लॅशसह हे चार कॅमेरे आयताकार कॅमेरा मॉड्यूलमध्ये सेट करण्यात आले आहेत. अन्य दोन कॅमेरे 2-मेगापिक्सलचे सेन्सर आहेत. तर फ्रंटमध्ये एक 8-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये वाय-फाय, एलटीई, ब्लूटूथ, एक 3.5 मिलिमीटर हेडफोन जॅक आणि चार्जिंगसाठी युएसबी टाइप-सी पोर्ट आहेत. याशिवाय, 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारी 5,000 एमएएच क्षमतेची दमदार बॅटरी यात आहे. 192 ग्रॅम वजन असलेला या फोनच्या मागे फिंगरप्रिंट सेन्सरही आहे. याशिवाय Dirac 2.0 ऑडिओ टेक्नॉलॉजीसह ड्युअल स्टीरिओ स्पीकर्स आहेत.

किंमत :–
6जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत 16 हजार 990 रुपये आहे. तर नुकतेच लाँच केलेल्या 8 जीबी रॅम व्हेरिअंटची किंमत 18 हजार 990 रुपये आहे.