Oppo K1 स्मार्टफोन भारतात लाँच करण्यात आला आहे. इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आणि गेम खेळणाऱ्यांना दर्जेदार अनुभव यावा यासाठी या स्मार्टफोनमध्ये हायपर बूस्ट तंत्रज्ञान आहे. इतर वैशिष्ट्यांबाबत सांगायचं झाल्यास यामध्ये वॉटरड्रॉप नॉच, 6.4 इंच डिस्प्ले, कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5, ड्युअल कॅमेरा सेटअप आणि ग्रेडिअंट ग्लास रिअर पॅनलचा समावेश आहे. सेल्फीसाठी यामध्ये 25 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे.

किंमत आणि लाँच ऑफर –
या स्मार्टफोनचं 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज मॉडल भारतात 16 हजार 990 रुपयांमध्ये उपलब्ध असेल. लवकरच या स्मार्टफोनचं 6 जीबी व्हेरिअंट लाँच केलं जाण्याची शक्यता आहे. अॅस्ट्रल ब्ल्यू आणि पिआनो ब्लॅक रंगात हा स्मार्टफोन उपलब्ध असेल. हा स्मार्टफोन गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात चिनमधील बाजारात लाँच करण्यात आला होता. 12 फेब्रुवारीपासून या स्मार्टफोनची इ-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर विक्री सुरू होईल. सिटीबँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डने फोन खरेदी करणाऱ्यांना 10 टक्के इंस्टंट डिस्काउंट मिळणार आहे.

Oppo K1 स्पेसिफिकेशन –
डिस्प्ले – 6.41 इंच
प्रोसेसर – 2.2 गीगाहर्ट्ज़ ऑक्टा-कोर
फ्रंट कॅमेरा – 25-मेगापिक्सल
रिझोल्यूशन – 1080×2340 पिक्सल
रॅम – 4 जीबी
ओएस – अँड्रॉ़इड 8.1 Oreo
स्टोरेज – 64 जीबी
रिअर कॅमेरा – 16-मेगापिक्सल + 2-मेगापिक्सल
बॅटरी क्षमता – 3600 एमएएच