30 September 2020

News Flash

लहान बाळांना ORS चं पाणी देताय? मग जाणून घ्या ही माहिती

प्रत्येक वयोगटानुसार ओआरएस सेवनाचे प्रमाण भिन्न असते

डॉ. तुषार पारेख

घरात एखादं लहान मुलं असेल तर त्याची विशेष काळजी घ्यावी लागते. ऋतू बदलल्यानंतर अनेकदा लहान मुलांना काही किरकोळ आजार जाणवू लागतात. परंतु, किरकोळ वाटणाऱ्या या आजारांकडे वेळीच लक्ष दिलं पाहिजे. पावसाळा सुरु झाला की लहान मुलांमध्ये अतिसार, जुलाब, उलट्या असे त्रास दिसून येतात. या आजारपणात बाळाला डिहायड्रेशन होतं. त्यामुळे अनेक स्त्रिया मुलांना ओआरएस (ORS) म्हणजेच ओरल रिहायड्रेशन सोल्युशन देतात. परंतु मुलांना ओआरएस देण्याचीदेखील एक पद्धत आहे. त्यामुळे लहान मुलांना अत्यंत काळजीपूर्वक ते द्यावं लागतं.

ओआरएसचा वापर कसा करावा?

१. ओआरएसची पावडर उकळून गार केलेल्या पाण्यात घालावी. पावडर पाण्यात घातल्यावर ती पूर्णपणे विरघळून जाईल याची काळजी घ्यावी. तसंच बाळाला देतांना फीडर किंवा ड्रॉपरचा वापर करून करावा. बाटलीद्वारे ओआरएस देऊ नका.

२. प्रत्येक वयोगटानुसार ओआरएस सेवनाचे प्रमाण भिन्न असू शकते. ओआरएस सुरक्षित आहे आणि सर्वच वयोगटासाठी त्याचा उपयोग केला जाऊ शकतात.

३.बाळाला उलट्या झाल्यास त्याच्या पोटात अन्न नसल्याकारणानेही बाळ डिहायड्रेट होऊ शकते. अशा वेळी पालकांनी बाळाला ओआरएस पाजावे. एकाच वेळी ग्लासभर ओआरएस पाजण्यापेक्षा थोड्या अंतराने ओआरएस पाजणे उत्तम ठरते.मात्र,४८ तासांमध्ये आपल्या बाळाच्या तब्येतीमध्ये सुधारण झाली नाही तर मात्र बाळाला त्वरीत रुग्णालयात दाखल करा.

दरम्यान, ओआरएसमध्ये सोडियम, पोटॅशियम, साखर आणि शरीराला आवश्यक असलेल्या इतर महत्वाच्या इलेक्ट्रोलाइट्सचा समावेश असतो. अतिसार किंवा उलट्या झालेल्या मुलांसाठी ओआरएस वरदान ठरू शकते. बाळाच्या शरीरातील द्रव पदार्थ प्रमाण कमी झाल्याने बाळ डिहायड्रेट होऊ शकतं.

( लेखक डॉ तुषार पारेख, पुणे येथील मदरहुड हॉस्पीटलमध्ये कन्‍सल्‍टंट निओनॅटोलॉजिस्ट आणि बालरोग तज्ज्ञ आहेत.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2020 4:31 pm

Web Title: ors solution will save you from dehydration ssj 93
Next Stories
1 Jawa BS6 आणि Jawa Forty Two BS6 च्या डिलिव्हरीला सुरूवात, पहिल्या तीन EMI वर 50% डिस्काउंट
2 शाओमीने भारतात लाँच केली Mi TV Stick, अ‍ॅमेझॉनच्या ‘फायर टीव्ही स्टिक’ला देणार टक्कर
3 8GB रॅमसह आला Oppo चा शानदार स्मार्टफोन, ‘पंच-होल डिस्प्ले’सह एकूण पाच कॅमेरे
Just Now!
X